Breaking News

सातारच्या के .एस. डी. शानभाग विद्यालयाच्या मुलींचे बास्केटबॉल स्पर्धेत स्पृहणीय यश

Success in the girls basketball competition of K.S. D. Shanbhag Vidyalaya, Satara

        सातारा - येथील श्यामसुंदरी चॅरिटेबल अँड रिलीजियस सोसायटीच्या के .एस. डी  शानभाग विद्यालय आणि ज्युनिअर कॉलेजच्या मुलींनी नुकत्याच संपन्न झालेल्या मिरज येथील बास्केटबॉल शूटिंग स्पर्धेमध्ये उत्तुंग यश मिळवले.

         कु.अविषा विकास गुरव या 11 वी सायन्स मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीने 3 पॉइंन्टर स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवला, तसेच फ्री प्रो इवेंटमध्ये तिसरा क्रमांक मिळविला.

         शानभाग विद्यालयाच्या दहावीत शिकणाऱ्या कु.जन्मदा जयवंत पवार हिने 3 पॉइंन्टर स्पर्धेमध्ये तिसरा क्रमांक मिळविला. या दोन्ही खेळाडूंना शाळेचे प्रशिक्षक अभिजीत मगर आणि शंकर गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल शाळेचे संस्थापक व ज्येष्ठ क्रीडा मार्गदर्शक रमेश शानभाग शाळेच्या संचालिका सौ . आचल घोरपडे .मुख्याध्यापिका माध्यमिक विभाग सौ .रेखा गायकवाड प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक भाग्ग्येश कुलकर्णी ,पालक संघाचे प्रतिनिधी तसेच सर्व शिक्षक शिक्षिकांनी या मुलींचे कौतुक करून त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा  दिल्या.

No comments