साखरवाडीत ज्यांना सत्ता दिली त्यांनी एकविचार व समन्वयाने कामकाज करण्याच्या संकल्पनेला हारताळ फासल्याने श्रीमंत रामराजे आक्रमक - श्रीमंत संजीवराजे
![]() |
निवडणूक प्रचार शुभारंभ सभेत मार्गदर्शन करताना श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर |
फलटण : मागील ग्रामपंचायत निवडणूकीमध्ये ९/८ असे बलाबल असल्याने राजे गटांतर्गत प्रतिनिधींना अडीच अडीच वर्षे सरपंचपद देण्याचा निर्णय सर्वसंमतीने होऊन विक्रम भोसले यांना प्रथम सरपंच पदाची संधी देण्यात आली, मात्र त्यांनी कार्यकाळ संपल्यावर दुसऱ्यांना संधी तर दिली नाहीच त्यापेक्षा जो एकविचार त्यांना सरपंचपद देताना सर्वांनी स्विकारला त्याला हरताळ फासून कोणालाही विश्वासात न घेता मनमानी कारभार सुरु केल्याने विकासाची प्रक्रिया ठप्प झाली. साखरवाडीत ज्यांना सत्ता दिली त्यांनी एकविचार व समन्वयाने कामकाज करण्याच्या संकल्पनेला हारताळ फासल्याने श्रीमंत रामराजे यांना या निवडणूकीबाबत ठोस भूमिका घेऊन कठोर निर्णय केवळ लोकहितासाठी घ्यावे लागल्याचे श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले.
साखरवाडी-पिंपळवाडी ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणूक प्रचार शुभारंभ सभेत मार्गदर्शन करताना श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर बोलत होते. यावेळी महानंदचे उपाध्यक्ष डी.के.पवार, मा.सभापती शंकरराव माडकर, बापूराव महादेव भोसले-पाटील, के.के.भोसले, अरुणकाका गायकवाड, अशोकराव सोनवणे, रमेशकाका बोंद्रे, सुरेशदादा भोसले, महादेवराव बोंद्रे, पोपटराव भोसले, सतीश माने, सौ.कौशल्याताई पवार, अशोकराव सोनावणे, सौ.कमलताई माडकर, आर.बी.भोसले, लक्ष्मणराव नाईक निंबाळकर, जनार्दन भोसले, रोहिदास नवले, सतीशराव उर्फ बाळासाहेब भोसले (वारकरी), सुधीर भोसले, विष्णूपंत गायकवाड, भारतशेठ व्होरा, दिलीपराव पवार, मारुती वाघ यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुरस्कृत राजे पॅनलचे सर्व उमेदवार, त्यांचे समर्थक, साखरवाडी पिंपळवाडीतील मतदार बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सत्तेत असलेली मंडळी काही मर्यादे पर्यंत कशीही वागली तरी दुर्लक्ष होते, मात्र मर्यादा ओलांडून वागली, तालुक्याच्या राजकारणात वेगळी भूमिका मांडण्याचा प्रयत्न झाल्याने श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी ठोस भूमिका घेऊन त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना ते न समजल्याने त्यांनी आपली भुमिका बदलली नसल्याने, श्रीमंत रामराजे यांनी ग्रामपंचायत निवडणूकीत सहभाग घेतला असून, त्या अशा अपप्रवृत्तींना त्यांची जागा दाखवून देण्यासाठी आवश्यक असल्याचे स्पष्ट करीत साखरवाडी व परिसराचा सर्वांगीण विकास, साखरवाडीला पूर्ववैभव, शेतकरी, कामगार, व्यापारी यांना योग्य मोबदला आणि येथील ग्रामस्थांना विकासाचा लाभ मिळण्यासाठी राजे पॅनलचे सर्व उमेदवार बहुमताने विजयी करण्याचे आवाहन श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी केले आहे
साखरवाडी व परिसराच्या विकासाचे साधन असलेला साखर कारखाना सुरळीत सुरु करण्याच्या प्रक्रियेत आणि गेल्या ५ वर्षात या भागाच्या विकासासाठी शासन, जिल्हा परिषद, पंचायत समिती वगैरे माध्यमातून सुरु असलेल्या प्रयत्नात त्यांचा कोठेही सहभाग राहिला नसल्याने त्यांच्या एकूणच वागण्यातुन गैरविश्वासाचे वातावरण निर्माण झाल्याचे श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी अनेक उदाहरणांसह वस्तुस्थिती साखरवाडी करांसमोर ठेवली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुरस्कृत राजे पॅनलला मतदान का करावे याबाबतची भूमिका स्पष्ट केली.
साखरवाडी कारखाना पुनरुज्जीवीत करताना या भागातील सुमारे साडेतीन चार लाख मे.टन गाळपास देणाऱ्या ऊस उत्पादक शेतकरी, कारखान्याचे कामगार, साखरवाडीची बाजारपेठ तेथील व्यापारी कामगार वगैरे सर्व घटकांच्या हिताचा विचार करुन या कारखाना व्यवस्थापनाला सतत मदत केली, ज्या आर्थिक संस्थांच्या माध्यमातून मदत केली त्या अडचणीत आल्या तरीही कारखान्याला मदत करण्याची भुमिका श्रीमंत रामराजे व आम्ही कायम ठेवली, त्यानंतर आता सक्षम यंत्रणा उभी राहिल्यानंतर त्यांच्यावर जबाबदारी नसताना मागील ऊस बिलाचा एक जादा हप्ता देण्याची जबाबदारी त्यांनी केवळ श्रीमंत रामराजे यांच्या शब्दाखातर त्यांनी स्वीकारली, दुसरा हप्ताही देणार आहेत, एफआरपी पेक्षा जादा दर देण्याची श्रीमंत रामराजे यांची मागणीही त्यांनी स्विकारली आहे, कामगार, व्यापारी यांनाही त्यांनी योग्य सहकार्य केल्याचे श्रीमंत संजीवराजे यांनी निदर्शनास आणून दिले.
कारखान्याची गाळप क्षमता वाढ, अर्कशाळा, इथेनॉल प्रकल्पाची उभारणी, कमिन्स प्रकल्प या माध्यमातून या भागाच्या विकासाला गती प्राप्त होत असताना बाजारपेठ व परीसर विकसीत झाल्याने त्याचा लाभ, नोकरी, उद्योग व्यवसायाच्या संधी उपलब्ध होणार आहेत या सर्व प्रक्रियेत ग्रामपंचायतीची भूमिका अत्यंत महत्वाची असल्याने ग्रामपंचायत अन्य सत्तास्थाने एक विचारांची असली तर त्याचे फायदे लगेच उपलब्ध होतील याची ग्वाही देत त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुरस्कृत राजे पॅनलच्या सर्व उमेदवारांना त्यांच्या छत्री, किटली व नारळ या चिन्हां समोरील बटण दाबून बहुमताने विजयी करण्याचे आवाहन श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी केले.
मा.सभापती शंकरराव माडकर म्हणाले, कोणालाही व्यक्तिगत सत्तेची संधी मिळत नाही, ती पक्ष, गटाच्या माध्यमातून प्राप्त होत असल्याने आपला कार्यकाळ त्या पक्ष, गटाच्या नेत्यांच्या सूचनेनुसार कामकाज करुन कालावधी संपताच सत्ता सोडावी असा प्रघात आहे, तथापी सर्वांना बरोबर घेऊन जाणून विश्वासाने काम केले तर संधी वाढवूनही मिळते येथे त्यापैकी काहीच न घडल्याने नाराजी निर्माण झाली, त्यातून राज्यातील सर्वोच्च पदावर असताना श्रीमंत रामराजे यांना ग्रामपंचायत निवडणूकीत लक्ष घालावे लागले ही दुर्दैवी बाब आहे. गेल्या २५/३० वर्षाच्या राजकारणात श्रीमंत रामराजे ग्रामपंचायत निवडणूकीत कधीच उतरले नाहीत, मात्र विकासा प्रक्रिया छेदणाऱ्या प्रवृत्तींना त्यांची जागा दाखवून देण्यासाठीच त्यांना खाली यावे लागले आहे.
डी.के.पवार म्हणाले, गेल्या ५ वर्षात विकासाची घडी पूर्णपणे विस्कटली असल्याने सर्वांना विकासापासून दूर जावे लागले, यापूर्वी विकासाची अनेक कामे झाली, पाणी पुरवठा योजना, रस्ते, सभामंडप उभारले गेले, स्वछता अभियान व अन्य शासकीय अभियान यशस्वीरित्या राबविल्याने साखरवाडीचा राज्यस्तरावर सन्मान, साडेबारा लाखाचा पुरस्कार प्राप्त झाला, मात्र गेल्या ५ वर्षात यापैकी काही ही घडले नाही.
पोपटराव भोसले म्हणाले, श्रीमंत रामराजे यांचे गेल्या २५/३० वर्षातील राजकारण लोकहिताला प्राधान्य देणारे, त्यातून त्यांनी बंद पडलेला कारखाना सुरु होण्यासाठी सतत प्रयत्न केला, अनेक मार्ग शोधले मात्र शेतकरी, कामगार, साखरवाडी बाजारपेठ आणि इथल्या सर्वसामान्य जनतेच्या हिताला प्राधान्य देऊन योग्य पद्धतीने कारखाना चालविणाऱ्या यंत्रणेला त्यांचे नेहमीच प्राधान्य राहिले, त्यातून सध्याच्या यंत्रणेला त्यांनी प्राधान्य दिले, हाच त्यांचा विचार ग्रामपंचायत निवडणूकीत लक्षात घेऊन राजे पॅनलच्या सर्व उमेदवारांना बहुमताने विजयी करण्यात साखरवाडीकरांचे हित आहे.
प्रारंभी सुनील माने यांनी सर्वांचे स्वागत केल्यानंतर प्रास्तविकात निवडणूकीची पार्श्वभूमी विस्ताराने मांडली व उमेदवारांचा परिचय करुन दिला.
No comments