महाराष्ट्रातील ४ अग्निशमन अधिकाऱ्यांना राष्ट्रपती अग्निशमन सेवा पदक जाहीर
नवी दिल्ली, दि. 25 : अग्निशमन सेवेमध्ये उल्लेखनीय कामगिरीसाठी महाराष्ट्रातील 4 अग्निशमन अधिकारी व कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती अग्निशमन सेवा पदक जाहीर झाले आहे.
सर्वोत्कृष्ट सेवेसाठी श्री.देवेंद्र प्रभाकर पोटफोडे (मुख्य अग्निशमन अधिकारी) यांना राष्ट्रपती अग्निशमन सेवा पदक, तर उत्कृष्ट सेवेसाठी अग्निशमन सेवा पदक यामध्ये संजय दादाजी पवार (प्रभारी मुख्य अग्निशमन अधिकारी), धर्मराज नारायणराव नकोड (सहायक स्टेशन अधिकारी), राजाराम कालु केदारी (अग्रणी फायरमन) यांचा समावेश आहे.
No comments