मुस्लिम समाजाच्या प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक त्वरित व्हावी - विविध संघटनांची मागणी
![]() |
प्रांताधिकारी शिवाजीराव जगताप यांना निवेदन देताना जाकीरभाई शिकलगार,सादिकभाई शेख,निजाजभाई आतार,जावेद शेख,जमशेद पठाण,समीर इनामदार, गुलाब शेख |
The pending issues of the Muslim community should be resolved immediately - the demands of various organizations
फलटण (प्रतिनिधी)- मुस्लिम समाजाचे विविध प्रश्न शासन दरबारी प्रलंबित असून त्याची सोडवणूक त्वरित व्हावी अशी मागणी मुस्लिम समाजातील विविध संघटनांच्या वतीने मुख्यमंत्री यांच्याकडे करण्यात आले असून यासंबंधीचे निवेदन फलटणचे प्रांताधिकारी व तहसीलदार यांना मुस्लिम समाजाच्या वतीने देण्यात आले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मुस्लिम समाजातील विविध संघटनांच्या वतीने पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे की अल्पसंख्याक मंत्रालयाचे वार्षिक बजेट किमान 2000 कोटी रुपये करावे, प्रत्येक जिल्ह्यात अल्पसंख्याक विकास संचालक या पदावर उपजिल्हाधिकारी दर्जाचे अधिकारी नियुक्त करावेत, अल्पसंख्याक समाजातील सामाजिक संस्थाना अल्पसंख्याक दर्जा देऊन शासन योजना तळागळातील गरजू पर्यंत पोचविण्यासाठी या संस्थांना विकास प्रक्रियेत सामील करावे, राज्य व जिल्हावार विकास प्रक्रिया व जिल्हा अग्रणी बँकेच्या वार्षिक वित्तपुरवठा आराखड्यामध्ये प्राधान्याने लक्ष देऊन पंधरा टक्के वित्तपुरवठा होण्यासाठी प्रभावी अंमलबजावणी करावी व यासाठी जिल्हा वित्त नियोजन कमिटीमध्ये अल्पसंख्याक सामाजिक संस्थाना प्रतिनिधी नियुक्त करावेत ,अल्पसंख्याक विकास योजना जनजागृतीसाठी व पंतप्रधान पंधरा कलमी कार्यक्रम प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रत्येक जिल्हाधिकारी यांना किमान दहा लाख रुपये निधी देण्यात यावा, प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा अल्पसंख्याक विकास संनियंत्रण समिती नवीन शासन निर्णय आल्यानंतर तातडीने स्थापन कराव्यात,वक्फ महामंडळाला आयएस, आयपीएस मुख्य कार्यकारी अधिकारी नियुक्त करावेत, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार मुस्लिमांना सरसकट शैक्षणिक आरक्षण देण्यात यावे अशा मागण्या या निवेदनात करण्यात आल्या असून सदरचे निवेदन प्रांताधिकारी डॉक्टर शिवाजीराव जगताप तहसीलदार समीर यादव यांना देण्यात आले तत्पूर्वी मुस्लिम समाजाचा जनजागृती मेळावा पार पडला यावेळी महाराष्ट्र मायनॉरिटी एनजीओ फोरमचे अध्यक्ष जाकीरभाई शिकलगार ,मुस्लिम ऑल इंडिया ओबीसी संघटनेचे अध्यक्ष सादिकभाई शेख, हाजी गुलाब शेख, हाजी निजामभाई आतार ,अब्दुलभाई सुतार, एडवोकेट समीर इनामदार ,अश्फाक खान, जमशेद पठाण, जावेद शेख सादिक बागवान, अल्ताफ पठाण अजीजभाई शेख, सैफुल्ला शेख, पप्पूभाई शेख, नगरसेवक बाळासाहेब मेटकरी, समीर तांबोळी ,आयाज आतार ,रशीद भाई तांबोळी, नजीरभाई शेख, रुकमोद्दीन नदाफ ,डॉक्टर लतीफ आतार,नसीर शिकलगार आदी उपस्थित होते.
No comments