श्रीमंत धीरेंद्रराजे आणि श्रीमंत डॉ. संयुक्ताराजे यांचा विवाह सोहळा राजेशाही थाटात संपन्न
![]() |
वधू-वरांना शुभाशीर्वाद देताना खा. शरद पवार, श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर, आमदार छत्रपती शिवेंद्रसिंह भोसले व अन्य मान्यवर |
Shrimant Dhirendraraje and Shrimant Dr. Samyuktaraje's wedding ceremony was held in a royal style
आसू दि. २८ : फलटण पंचायत समितीचे सभापती आणि सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक श्रीमंत शिवरुपराजे यशवंतराव निंबाळकर ऊर्फ बाळराजे खर्डेकर यांचे सुपुत्र श्रीमंत धीरेंद्रराजे आणि श्रीमंत नितीनराव काळे- देशमुख यांची सुकन्या श्रीमंत डॉ. सयुक्ताराजे यांचा शुभविवाह नुकताच कोरेगाव पार्क, पुणे येथील हॉटेल वेस्टइन मध्ये सोशल डीस्टनसिंग वापर करुन राजेशाही थाटात, मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
![]() |
श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, उपमुख्यमंत्री ना. अजित पवार, सहकार मंत्री ना. बाळासाहेब पाटील, ना. दत्ता मामा भरणे व मान्यवर वधू-वरांना शुभाशीर्वाद देताना |
या प्रसंगी वधू-वरांना शुभाशिर्वाद देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरदराव पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, राजमाता श्री. छ. कल्पनाराजे भोसले, श्री. छ. खा. उदयनराजे भोसले, छत्रपती शाहू महाराज कोल्हापूर, छत्रपती संभाजी राजे भोसले कोल्हापूर, खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, ना. दत्तामामा भरणे, ना. बाळासाहेब पाटील, आ. दिपकराव चव्हाण, श्रीनिवास पवार तथा बापूसाहेब, सौ. शर्मिला वहिनी पवार, आ. मकरंद पाटील, माजी आमदार प्रभाकर घार्गे, वखार महामंडळाचे एमडी दीपक तावरे, पीएमआरडीचे सुहास दिवसे, राज्याचे कामगार आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर, स्मार्ट सिटी पुणे प्रोजेक्टचे राजेंद्र जगताप, महाराष्ट्र राज्याचे पणन संचालक सतीश सोनी, महाराष्ट्र राज्य पणन महामंडळाचे कार्यकारी संचालक सुनील पवार, राज्याचे अतिरिक्त सहाय्यक सुधीर तुंगार, नवी मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुजता ढोले यांच्यासह राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
No comments