अश्लील व्हिडिओ दाखवून लहान मुलांवर लैंगिक अत्याचार
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - फलटण येथील 8 वर्षे व 9 वर्षाच्या लहान मुलांना मोबाईलवर गेम दाखवतो असे सांगून, त्यांना अश्लील व्हिडिओ दाखवून, वेळोवेळी त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आखरी रास्ता, मंगळवार पेठ येथील 16 वर्षीय व 17 वर्षीय आशा दोन मुलांच्या विरोधात इंडियन पिनल कोड अंतर्गत अनैसर्गिक अत्याचार व पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फलटण शहर पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार, आखरी रास्ता, मंगळवार पेठेतील 16 व 17 वर्षाच्या दोन अल्पवयीन मुलांनी त्यांच्या घराशेजारी राहणाऱ्या 8 वर्षीय व 9 वर्षीय पीडित मूलांना मोबाइलवरती गेम दाखवतो असे सांगून, त्यांना अश्लील व्हिडिओ दाखवले आहेत. दिनांक 9 सप्टेंबर 2020 पासून ते 3 डिसेंबर 2020 रोजी पर्यंत पीडित 8 वर्षीय व 9 वर्षीय मुलांवर वेळोवेळी अश्लील व्हिडीओ दाखवून त्यांचेवर लैंगीक अत्याचार करुन अनैसर्गिक जबरी संभोग केला आहे. आरोपीत 16 वर्षीय व 17 वर्षीय मुलांवर इंडियन पिनल कोड अंतर्गत अनैसर्गिक अत्याचार व पोक्सो अंतर्गत फलटण शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक भंडारे हे करीत आहेत.
पालकांनी अल्पवयीन मुलांना मोबाइल दिल्यानंतर मुले त्याचा कसा गैरवापर करतात यावरून दिसून आले आहे. तरी मुलांना मोबाईल दिल्यानंतर, त्यांच्यावर पालकांनी लक्ष दिले पाहिजे. मोबाईल वर आपला पाल्य काय करतो याची प्रत्येक पालकांनी माहिती घ्यावी असे आवाहन पोलिस निरीक्षक प्रताप पोमण यांनी केले आहे.
No comments