आमिष दाखवून व दमदाटी करून महिलेवर वारंवार बलात्कार
फलटण दि.२५ (गंधवार्ता वृत्तसेवा) - महिलेस घर बांधून देतो व मुलांना सांभाळतो असे आमिष दाखवून तसेच शिवीगाळ व दमदाटी करून वारंवार महिलेची इच्छा नसताना तिच्याशी शरीरसंबंध ठेवून बलात्कार केल्याप्रकरणी झिरपवाडी येथील एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फलटण शहर पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 11 ऑक्टोबर 2020 रोजी रात्री 11:50 वाजण्याच्या सुमारास ते 15 डिसेंबर 2020 रोजी रात्री 11:00 वाजणेच्या दरम्यान झिरपवाडी तालुका फलटण येथील हॉटेल वास्को च्या पाठीमागील खोलीमध्ये, झिरपवाडी येथील धनंजय गुंजवटे याने, पीडित महिलेस तुला घर बांधून देतो, तुझ्या मुलांना सांभाळतो, तुझे सर्वकाही मी पाहतो, असे आमिष देऊन, तसेच शिवीगाळ व दमदाटी करून वारंवार पीडित महिलेची इच्छा नसताना, जबरदस्तीने शरीर संबंध ठेवून बलात्कार केला असल्याची फिर्याद पीडित महिलेने दिली आहे.
अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक बनकर हे करीत आहे.
No comments