Breaking News

कंगना ट्रोल ; तुम्हारी तो फट जाएगी.... कंगनाचे उत्तर

 गंधवार्ता फिल्मीगंध 
Kangana was trolled on social media

         फिल्मीगंध  - अभिनेत्री कंगना राणावत यांनी आपला बिकिनी घातलेला फोटो, सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर, सोशल मीडियावर कंगनाला ट्रोल करण्यात आले. मात्र कंगना राणावत हिने ट्रोल करणार्‍यांना खडेबोल सुनावत, भैरवी मातेचे उदाहरण दिल्यानंतर, पुन्हा एकदा नेटकर्‍यांनी  कंगनाला ट्रोल केले आहे. 

        कंगनाने बुधवारी सोशल मीडियावर आपला बिकिनीतील एक फोटो शेअर केला आहे. यात ती समुद्रकिनारी बसलेली दिसत आहे. मात्र या फोटोमुळे ती वादात सापडली. सोशल मीडिया यूजर्सनी तिच्या या फोटोवर संताप व्यक्त केला तर काहींनी तिची खिल्ली उडवली आहे. 

        मॅक्सिको ट्रीपदरम्यान काढलेला फोटा ट्विटर वर शेअर करत कंगनाने लिहिले, “सुप्रभात मित्रांनो, सध्या जगातील सर्वात सुंदर देशांपैकी एक मॅक्सिको येथे आहे. सुंदर आणि कल्पनेच्या पलिकडलं ठिकाण. मॅक्सिकोमधील एका बेटावर मी हा फोटो काढला आहे.” अशा आशयाची पोस्ट तिने शेअर केली.

        या बिकिनी फोटोवरून काही नेटिझन्सनी म्हटले आहे, कंगना जी, मला फक्त एक विनंती करायची आहे, चित्रपट करणं म्हणजे अभिनय करणं आपलं काम आहे, त्या कामात तुम्ही ज्या प्रकारच्या कपड्यांचा वापर करता त्यात आम्हाला काही अडचण नाही, पण तुम्ही आज ट्विटरवर हा फोटो टाकाला. आज हिंदुस्थान आपल्याला हिंदू शेरनी बोलत आहे त्या सर्वांचे काय? तर दुसऱ्याने असे म्हटले आहे की, जिने झाशीच्या राणीची भूमिका वठवली, तिच्याकडून शिकायला हवे, असे म्हणत तिला टोला लगावला आहे.

        बिकिनी फोटोवरुन ट्रोल करणा-यांना अभिनेत्री कंगना रनौतने  खडे बोल सुनावले आहेत. ती म्हणाली, ''काही लोक माझे बिकिनीवरचा फोटो पाहून मला धर्म आणि सनातनचे लेक्चर देत आहेत, कधी देवी भैरवीची केस मोकळे सोडलेले वस्त्रहीन, रक्त पिणारी छबी तुमच्या समोर आली तर तुमचे काय होईल? तुमची तर फाटेलच, आणि स्वत:ला भक्त  म्हणवता,  धर्माच्या मार्गाने चला, धर्माचे ठेकेदार बनू नका…जय श्री राम.'' अशा आशयाची पोस्ट करत कंगनाने ट्रोलर्सला प्रत्युत्तर दिले आहे.

        ट्रोलर्सला प्रत्युत्तर दिल्यानंतर पुन्हा नेटिझन्स यांनी  माँ भैरवीशी तुलना केली गेल्यामुळे संताप व्यक्त केला आहे. या प्रतिक्रिया मध्ये, आम्ही तुमचे समर्थन केले तर तुम्ही आमच्याच देवी देवतांशी आपल्या नग्न चित्रांची तुलना करत आहात, हे खरोखर एक मूर्ख ट्विट आहे.  आम्ही वातावरण लक्षात घेऊन आपले समर्थन केले, परंतु याचा अर्थ असा नाही की आपण काहीही लिहाल,  या ट्विटबद्दल क्षमा मागा, अशा प्रतिक्रिया मिळाल्या आहेत.

No comments