2 कोटी 90 लाख रुपयांची फळ खरेदी केल्याबाबत खोटे दस्तऐवज तयार करून व्यपाऱ्याची फसवणुक
बारामती दि. 27 (गंधवार्ता वृत्तसेवा) - बारामती येथील व्यापाऱ्याशी, फळे विक्री बाबत खोटे दस्त करारनामा करून, एकूण 2 कोटी 90 लाख 73 हजार रुपयांची फळे खरेदी केली असल्याचे भासवले असून, बारामती येथील व्यापाऱ्याची फसवणूक व खोट्या दस्तऐवज प्रकरणी शिरवली ता.बारामती येथील 5 जन व सोमंथळी ता. फलटण येथील एकजणांविरुद्ध बारामती पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बारामती पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार 1) राहुल शिवाजी खोमणे 2) हनुमंत जगन्नाथ नाझिरकर 3) संगीता हनुमंत नाझीरकर 4) गीतांजली हनुमंत नाझीरकर 5) सतीश भीकाराम वायसे सर्व रा. शिरवली ता. बारामती जि पुणे 6) गुलाब देना धावडे रा. सोमंथळी ता.फलटण जि.सातारा यांनी बारामती येथे, सन 2011 ते माहे नोव्हेंबर 2020 पर्यंत, फिर्यादी वाजली छोटू बागवान व साक्षीदार यांच्याशी फळे विक्री बाबत खोटे दस्त करारनामा करून, एकूण 2 कोटी 90 लाख 73 हजार रुपयांची फळे खरेदी केली असल्याचे भासवले असल्याची फिर्याद वाजली छोटू बागवान वय 55 वर्षे, धंदा व्यापार, रा म्हाडा काॅलनी बारामती जि.पुणे यांनी दिली आहे.
अधिक तपास पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे करीत आहेत.
No comments