Breaking News

शेजाऱ्याच्या चुकीमुळे ऊस शेतीला आग : 2 लाख रुपयांचे नुकसान

Fire at sugarcane farm due to neighbor's mistake: Loss of Rs 2 lakh

        फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - मौजे मुंजवडी तालुका फलटण गावच्या हद्दीत, शेजारी शेतकरी यांच्या चुकीमुळे, शॉर्टसर्किट होऊन लागलेल्या आगीत 4 एकर ऊस व ड्रीप ला आग लागून अंदाजव 2 लाख रुपयांचे नुकसान झाले प्रकरणी मुंजवडी येथील एकावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

        फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार,  रोहित पोपटराव वाघमोडे  वय 29 वर्षे, रा. बागेवाडी, बरड तालुका फलटण यांची  मौजे मुंजवडी तालुका फलटण गावच्या हद्दीत जमीन गट नंबर 106 108 109 ही आहे. दिनांक 31 ऑक्टोबर 2020 रोजी दुपारी 12: 30 ते 1 वाजण्याच्या सुमारास, मौजे मुंजवडी तालुका फलटण गावच्या हद्दीत असणाऱ्या उपरोक्त जमिनीच्या शेजारी असलेले नामदेव नारायण खुरंगे राहणार मुंजवडी तालुका फलटण यांच्या इलेक्ट्रिक पोल वरून केबल वायर टाकून त्या वायरचे जॉईंट उघडे ठेवल्यामुळे त्यांच्या उसाच्या पाचटाचा लाईटचे शॉर्टसर्किट होऊन विद्युत् करणे सदर उसास आग लागली असून त्यांच्या उसातून आग शेजारी असणाऱ्या रोहित पोपटराव वाघमोडे यांच्या 41 ऊस व जैन कंपनीची वॉटर ड्रीप यांना आग लागली. शेजारी नामदेव खुरंगे यांच्या चुकीमुळे वाघमोडे यांच्या ऊस व ड्रीप ला आग लागली असून, त्या आगीमध्ये वाघमोडे यांचे अंदाजे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याची फिर्याद रोहित पोपटराव वाघमोडे यांनी फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनला दिली आहे. अधिक तपास सहाय्यक फौजदार सूर्यवंशी करीत आहेत.

No comments