शांतिकाका सराफ दुकानात खरेदीस आलेल्या जोडप्याकडून दीड लाख रुपयांचे गंठण लंपास
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) -: फलटण-दहिवडी रस्त्यावरील पृथ्वी चौक, फलटण या अत्यंत गजबजलेल्या व रहदारीच्या चौकातील शांतीकाका सराफ नावाचे दुकानातून खरेदीच्या बहाण्याने आलेल्या अज्ञात जोडप्याने सुमारे दीड लाख रुपये किमतीचे सोन्याचे गंठन हातचलाखीने चोरुन नेल्याच्या आरोपाचा गुन्हा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे.
याबाबत शहर पोलीस ठाण्यातून देण्यात आलेल्या माहितीनुसार, गुरुवार दि. २४ रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास शांतीकाका सराफ नावाचे वरील दुकानात अंदाजे 30 वर्षीय अनोळखी स्त्री व 35 वर्षीय अनोळखी पुरुष अशा दोघांनी सोन्याचे गंठन खरेदी करण्यासाठी आल्याचे सांगितले. सदर जोडप्याने गंठण पहात असताना फिर्यादी व दुकानातील अन्य व्यक्तींची नजर चुकवून हात चलाखीने सुमारे दीड लाख रुपये किमतीचे ३१ ग्रॅम ७१० मिली ग्रॅम वजनाचे पूर्ण सोन्याची पट्टी असलेले सोन्याचे गंठण घेऊन पोबारा केल्याचे फिर्यादीत नमूद असल्याचे पोलिसांनी सांगितले.
दोघा अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पोलीस हवालदार वीरकर अधिक तपास करीत आहेत.
No comments