राजू मारुडा यांची आरपीआय जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती
![]() |
राजू मारुडा यांचे पुष्पहार घालुन अभिनंदन करताना अशोकराव गायकवाड शेजारी आरपीआय पदाधिकारी |
Appointment of Raju Maruda as RPI District Vice President
फलटण - : येथील मेहतर रुखी समाजाचे नेते राजू मारुडा यांची आरपीआय जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्तीची घोषणा आरपीआय जिल्हाध्यक्ष अशोकराव गायकवाड, जिल्हा सचिव विजय येवले यांच्या उपस्थितीत करण्यात आली असून या नियुक्तीबद्दल त्यांचे विविध स्तरावरुन अभिनंदन होत आहे.
राजू मारुडा यांनी गेली 35 वर्षे आरपीआयच्या माध्यमातुन फुले, आंबेडकरी चळवळीत सामान्य कार्यकर्ता म्हणुन निष्ठेने काम केले आहे. त्यांच्यावर जिल्हा उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली असून आरपीआयमध्ये सर्व जातीधर्मातील कार्यकर्त्यांना समतोल स्थान देवून कामाची संधी देण्याची जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड यांच्या कामकाज पध्दतीचे मेहतर रुखी समाजातून कौतुक होत आहे.
आरपीआय सरचिटणीस मुन्ना शेख तालुकाध्यक्ष संजय निकाळजे, उपाध्यक्ष सतीश अहिवळे, शहराध्यक्ष लक्ष्मण अहिवळे, युथ शहराध्यक्ष सागर लोंढे यांच्यासह जिल्ह्यातील आरपीआय पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी राजू मारुडा यांचे अभिनंदन करुन त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
No comments