सातारा येथे श्री उत्तर चिदंबरम नटराज मंदिराच्या वार्षिक उत्सवाचे आयोजन
दि. 25 डिसेंबर ते 30 डिसेंबर दरम्यान धार्मीक कार्यक्रम: यंदा करोनामुळे रथोत्सव सोहळा रदद
सातारा - येथील श्री उत्तर चिदंबरम नटराज मंदिर साताराच्या देव देवतांचा वार्षिक उत्सव सोहळा शुक्रवार दि. 25 डिसेंबर 2020 ते बुधवार दि.30 डिसेंबर 2020 दरम्यान साजरा होत आहे. कांची कामकोटी पीठाचे जगदगुरु शंकराचार्य महास्वामी श्री श्री चंद्रशेखरेंद्र सरस्वती स्वामी यांच्या व महास्वामी प.पू. श्री श्री जयेंद्र सरस्वती यांच्या कृपेने व परमपूज्य जगदगुरु शंकराचार्य श्री श्री शंकर विजयेंद्र सरस्वती यांचे शुभाशिर्वादाने हा सोहळा संपन्न होत आहे.
मात्र यावर्षी करोना आजाराचे संकट असल्याने दरवर्षी साजरा होणारा भव्य दिव्य आणि साातारा शहरातुून निघणारा नटराज आणि देव देवातंा वा्र्षिक रथोत्सव मात्र रद्द् करण्याचा निर्णय मंदीर व्यवस्थापन समितीने घेतला आहे.
वार्षिक उत्सवातील सर्व धार्मीक कायर्ंक्रम हे मंदिरातच सामाजिक अंतर राखून तसेच प्रत्येक सहभागी होणार्या भावीकांनी तोंडाला मास्क लावूनच साजरे केले जाणार आहेत. मंदीरात या काळात अजिबात गर्दी करु नये तसेच व्यवस्थापनाने दिलेल्या नियम आणि अटींचे तसेच सुचनांचे पालन करतच सहकायर्ं करावे असे आवाहनही करण्यात आले आहे.
वार्षिक उत्सवानिमित्त मंदिरात शुक्रवार दि. 25 डिसेंबर 2020 रोजी सायंकाळी 5 वाजता ध्वजारोहण व प्रधान संकल्प संपन्न होणार आहे. तसेच शनिवारी दि. 26 रोजी सकाळी 6 ते दुपारी 12 या वेळेत श्री गणपती होम होवून सायंकाळी 6वा. श्री राधाकृष्ण देवतांचा कल्याणउत्सव अर्थात लग्नसोहळा संपन्न होणार आहे. रविवार दि. 27 डिसेंबरला सकाळी 6 ते 12 या वेळेत घटस्थापना होउन महागणपती,राधाकृष्ण, श्रीमूलनाथेश्वर, उमा देवी यांचा मूलमंत्र जप, होम,अभिषेक व आरती होणार आहे. नटराज मंदिरात संपन्न होणारे वार्षिक रथोत्सव सोहळयातील सर्व धार्मिक कार्यक्रम सातारा येथील वेदमुर्ती दत्ताशास्त्री जोशी यांचे अधिपत्याखाली विविध ब्रह्मवृंदाच्या सहकार्याने संपन्न होणार आहेत.
सोमवार दि. 28 रोजी सायंकाळी सहा वाजता दिपोत्सव तसेच श्री महागपतीचा रथोत्सव संपन्न होणार आहे.मंगळवारी दि. 29 डिसेंबरला सकाळी 5 ते 12 या वेळेत श्री गणपती होम, मुर्ती यात्रा दान आणि रुद्र होम हाणार आहे. बुधवारी दि. 30 डिसेंबरा चर्तुवेद पारायण होउन पुणे येथील श्री राधाकृष्ण शास्त्री मेमोरियल ट्रस्टचे वतीने श्री नटराज व शिवकामसुंदरी देवीस महाभिषेक होउन या देवाचा लग्न सोहळा अर्थात कल्याणोत्सव संपन्न होणार आहे. त्यानंतर पारायण समाप्ती होउन महाप्रसाद वितरीत केला जाणार आहे. वरील सर्व रथोत्सवाचे कार्यक्रमास सातारकर भावीकांनी तन, मन,धन अर्पून मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन नटराज मंदिराचे व्यवस्थापकिय विश्वस्त रमेश शानभाग यांनी केले आहे.
No comments