सातारा 179 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज; 409 जणांचे नमुने पाठविले तपासणीला
सातारा दि. 4 : जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 179 नागरिकांना घरी सोडण्यात आले असून 409 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
409 जणांचे नमुने पाठविले तपासणीला
स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 12, कराड येथील 17, फलटण येथील 8, कोरेगाव येथील 16, वाई येथील 12, खंडाळा येथील 17, रायगाव येथील 29, पानमळेवाडी येथील 66, महाबळेश्वर येथील 12, पाटण 30, दहिवडी 9, खावली 71, तळमावले 15, म्हसवड 20, तरडगाव 23 व कृष्णा मेडीकल कॉलेज कराड येथील 52 असे एकूण 409 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहे, अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
घेतलेले एकूण नमुने – 253096
एकूण बाधित -- 51659
घरी सोडण्यात आलेले -49334
मृत्यू -- 1726
उपचारार्थ रुग्ण -- 599
No comments