Breaking News

मोबाईल चोरट्यास अटक; 5 मोबाईल हस्तगत

        फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. 13 नोव्हेंबर -  जय हिंद करीअर अकॅडमी वाजेगाव फलटण येथील प्रशिक्षणार्थी याचे मोबाईल चोरणाऱ्या चोरट्यास फलटण ग्रामीण पोलीसायांचेकडुन अटक करण्यात आले असून त्याच्या कडून चोरी केलेले 5 मोबाईल ही हस्तगत करण्यात आले आहेत.

        फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार दिनांक दि.९ ऑक्टोबर २०२० रोजी रात्रो ०१-०० वा. समारास मौजे वाजेगाव ता. फलटण गावच्या हद्दीत असणाऱ्या जयहिंद करीअर अकॅडमी येथे, प्रशिक्षणार्थी मुले राहत असणाऱ्या पत्र्याचे शेड मध्ये प्रशिक्षणार्थी झोपलेले असताना, त्यांचे मोबाईल कोणीतरी अज्ञात चोरटयांनी त्यांच्या समती शिवाय लबाडीने चोरुन नेले होते. याबाबत फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. सदर गुन्हयाचे उघडकीस आणने कामी उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.तानाजी बरडे साो यांनी सुचना दिलेल्या होत्या, त्या नुसार स.पो.नि. बोंबले  व डी.बी.पथक,गोपणीय बातमीदार मार्फत व तांत्रिक विश्लेषना द्वारे सदर गुन्हा उघडकीस आणुन आरोपी, यास भिगवण ता. इंदापुर जि.पुणे येथुन ताब्यात घेवुन, आरोपी याच्या कडुन एकूण ४०,०००/- रुपये किमतीचे पाच मोबाईल हस्तगत केले आहेत. 

        सदरची कारवाई ही पोलीस अधिक्षक सो सातारा अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधिक्षक  धिरज पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे, पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांच्या मार्गदर्शना खाली सहा पो. निरीक्षक एस.एस. बोंबले, पोलीस हवा.कांबळे तसेच  बरड पोलीस दुरक्षेत्र येथील अंमलदार व फलटण ग्रामीण पोलीस ठाणे येथील गुन्हे शोध पथकातील पो.ना.काशीद, पो.ना.तुपे, पो.शि. जगदाळे, पो.शि.पाटोळे, पो.शि.कुंभार यांनी कारवाईत सहभाग घेतला. सदर कारवाई दरम्यान सायबर सेल अधिकारी व अंमलदार यांचे वेळो वेळी सहकार्य लाभले.

No comments