Breaking News

पुणे पदवीधर मतदार संघात महाविकास आघाडीतर्फे अरुण लाड यांना उमेदवारी

        गंधवार्ता वृत्तसेवा दि. 12 नोव्हेंबर - विधानपरिषद निवडणुकीत पदवीधर मतदारसंघातून पुणे विभागातून राष्ट्रवादीचे श्री. अरुण लाड तर औरंगाबाद विभागात राष्ट्रवादीचे श्री. सतीश चव्हाण यांना महाविकास आघाडीतर्फे उमेदवार म्हणून घोषित करण्यात येत असल्याचे आज राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील  यांनी जाहीर केले. 

         पदवीधर मतदारसंघ पुणे विभागाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार श्री. अरुण (अण्णा) लाड यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ना. बाळासाहेब थोरात,  राज्यमंत्री सतेज पाटील, राज्यमंत्री  विश्वजीत कदम,   खासदार वंदना चव्हाण, पुणे मनपाचे माजी महापौर अंकुश काकडे आणि महाविकास आघाडीचे इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. 

        महत्त्वाच्या अशा मानल्या जाणाऱ्या पुणे पदवीधर मतदारसंघात सुशिक्षित आणि कार्यतत्पर उमेदवार देणे गरजेचे होते. क्रांती समूहाच्या माध्यमातून अरूण अण्णा यांनी सामाजिक कार्य केले आहे. त्यामुळे महाविकासआघाडीने त्यांची निवड केली. मला खात्री आहे की मतदार त्यांच्या बाजूनेच कौल देतील आणि पुणे व औरंगाबाद विभागातील दोन्ही उमेदवार या निवडणूकीत विजयी होतील असा विश्‍वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केला. 

No comments