हरीश उर्फ आप्पा काकडे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे, माजी तालुकाध्यक्ष हरीश काकडे उर्फ आप्पा यांनी विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये जाहीर प्रवेश केला.
प्रवेशाप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा हातात देऊन, विधान परिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी हरीश काकडे यांचे पक्षामध्ये स्वागत केले.
हरीश काकडे हे सामाजिक चळवळीत अग्रेसर असतात, त्यांनी विविध संघटना व पक्षामध्ये विविध पदे भूषविलेली आहेत. रिपाई आठवले गटामध्ये ते तालुकाध्यक्ष होते. नॅशनल दलित मुव्हमेंट मध्ये देखील त्यांनी योगदान दिले आहे. हरीश काकडे यांनी, त्यांना मिळालेला पदांचा उपयोग हा गोरगरीब जनतेच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी प्रामुख्याने केला आहे.


No comments