फलटण तालुक्यात 34 कोरोना पॉझिटिव्ह तर 2 मृत्यू
Corona virus phaltan updates : 2 diad and 34 corona positive
फलटण दि. 25 नोव्हेंबर (गंधवार्ता वृत्तसेवा) - जिल्हा प्रशासनाकडून आज 25 ऑक्टोबर 2020 रोजी जाहीर केलेल्या अहवालानुसार, फलटण तालुक्यात आज 34 व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. यामध्ये शहरात 5 व्यक्ती व ग्रामीण भागात 29 रुग्ण सापडले आहेत. तर 2 व्यक्ती मृत पावल्या असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी गंधवार्ताला दिली आहे.
फलटण शहरात 5 कोरोना पॉझिटिव्ह
यामध्ये फलटण 1, लक्ष्मीनगर 2, रिंग रोड फलटण 2 व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत.
ग्रामीण भागात 29 कोरोना पॉझिटिव्ह
यामध्ये पिंपळवाडी 8, काशिदवाडी 3, कोळकी 4, तरडगाव 2, जिंती 1, सस्तेफाटा 1, साखरवाडी 2, रावडी बु 1, पिंपळगाव 1, वाखरी 1, निंभोरे 1, तावडी 1, सांगवी 1, कापडगाव 1, मिरडेवाडी 1 व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी गंधवार्ताला दिली आहे.
2 रुग्णाचा मृत्यू
कोळकी ता. फलटण येथील 38 वर्षीय पुरुष, संत भानुदास नगर ता. फलटण येथील 81 वर्षीय पुरुष या कोरोना बाधिताचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.


No comments