अश्विनी कदम यांची राष्ट्रवादी काँग्रेस युवती सेलच्या कोरेगाव तालुका अध्यक्षपदी निवड
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्रजी पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली खा. सौ. सुप्रिया ताई सुळे तसेच राष्ट्रवादी युवती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सक्षणाताई सलगर यांच्या मान्यतेने अश्विनी दिदी रामचंद्र कदम यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवती सेलच्या कोरेगाव तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
अश्विनी कदम यांची राष्ट्रवादी काँग्रेस युवती सेलच्या कोरेगाव तालुका अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब, प्रदेशअध्यक्ष जयंतरावजी पाटील, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, खा. सौ. सुप्रियाताई सुळे, आ.रोहितदादा पवार, राष्ट्रवादी युवती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर यांनी अभिनंदन केले. तसेच नियुक्तीपत्र देताना व्यासपिठावर उपस्थित विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील,आ. शशिंकात शिंदे , आ. दिपक चव्हाण, सारंग बाबा श्रीनिवास पाटील, युवक प्रदेश अध्यक्ष मेहबूब भाई शेख, जिल्हाअध्यक्ष सुनिल माने, जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील आबा, मा. उपसभापती पं. स. को. तालुका अध्यक्ष मा. भास्करदादा कदम, कार्याध्यक्ष रविकांत दादा वर्पे, युवक जिल्हाध्यक्ष तेजस शिंदे, महिला - जिल्हाध्यक्षा समिंद्राताई जाधव, तालुकाध्यक्ष सौ. प्रतिभाताई बर्गे, सीमाताई जाधव, युवती जिल्हाध्यक्ष पूजा काळे यांनी अभिनंदन करून भावी सामाजिक व राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


No comments