शिंदेनगर येथे विवाहितेच्या जाचहाट प्रकरणी 5 जणांवर गुन्हा दाखल
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - घरातील किरकोळ कारणावरून वेळोवेळी विवाहितेचा वेळोवेळी शारीरिक व मानसिक छळ करून घर काढण्यासाठी माहेरून पैसे घेऊन ये म्हणून विवाहितेस मारहाण करून शिवीगाळ केल्याप्रकरणी ग्रामीण पोलीस स्टेशनला पाच जणांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार सौ. विद्या महादेव जाधव राहणार शिंदेनगर तालुका फलटण यांना दिनांक 10 मे 2016 ते दिनांक 26 सप्टेंबर 2020 रोजी दुपारी तीन वाजण्या च्या दरम्यान मौजे शिंदेनगर तालुका फलटण गावच्या हद्दीत, त्यांच्या पतीच्या म्हणजेच सासरच्या घरी, सासरे बाबासो जाधव, सासू जनाबाई जाधव, पती महादेव जाधव, दीर सुभाष जाधव, जाऊ वनिता जाधव सर्व राहणार शिंदेनगर तालुका फलटण यांनी घरातील किरकोळ कारणावरून, वेळोवेळी जाच हाट करून, फिर्यादीचा मानसिक, शारीरिक छळ करून, घरखर्चासाठी तुझ्या माहेरून पैसे घेऊन ये, पैसे नाही आणले म्हणून, सौ विद्या यांना मारहाण करून शिवीगाळ दमदाटी केली असल्याची फिर्याद सौ. विद्या महादेव जाधव यांनी ग्रामीण पोलीस स्टेशनला दिली आहे. अधिक तपास सहा. पोलीस फौजदार एस. एस. सूर्यवंशी करीत आहेत.

No comments