कॉमेडियन भारती सिंहच्या घरी सापडला गांजा
गंधवार्ता वृत्तसेवा- विनोद कलाकार भारती सिंहला नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोने आज अटक केली. चौकशी दरम्यान भारती आणि तिचे पती हर्ष यांनी गांजा घेतल्याची कबुली दिली आहे. भारतीच्या पतीची अद्याप चौकशी सुरूच आहे. भारतीचे घर आणि प्रॉडक्शन हाऊसवर नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोने छापा टाकला. दोन्ही ठिकाणाहून नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोच्या अधिकाऱ्यांनी 86.5 ग्रॅम गांजा जप्त केला आहे.
अंमली पदार्थ तस्कराच्या चौकशीत या दोघांची नावे समोर आली होती. त्यानंतर भारतीच्या अंधेरी, लोखंडवाला आणि वर्सोवा येथील तिन्ही घरांवर रेड टाकण्यात आली. विशेष म्हणजे, या धाडीत नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो च्या टीमने अंमली पदार्थ जप्त केले आहेत.

No comments