रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया फलटण यांच्याकडून तहसीलदार समीर यादव यांचे स्वागत
फलटण - रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) फलटण यांच्या शिष्टमंडळाने नूतन तहसीलदार समीर यादव यांची भेट घेऊन, स्वागत केले. तसेच दि. 29 सप्टेंबर रोजी करण्यात आलेल्या धरणे आंदोलन व दिलेल्या निवदेणाबाबत चर्चा केली. यामध्ये तहसीलदार समीर यादव यांनी, मागणी निवेदना बाबत कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन दिले. यावेळी रिपाइंचे विजय येवले, मधुकर काकडे, संजय निकाळजे, राजू मारुडा, तेजस काकडे, विक्रम काकडे, अमित येवले उपस्थित होते.
No comments