Breaking News

सातारा कोविड हॉस्पिटल सोमवार पासून सातारकरांच्या सेवेत - जिल्हाधिकारी शेखर सिंह

 

        सातारा दि. 9 - आज मुख्यमंत्री,  मुख्यमंत्री यांच्या हस्ते आणि विधान परिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली, पालकमंत्री बाळासाहेब पाटील, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, आमदार आणि पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा कोविड हॉस्पिटलचे उदघाटन झाले.  आता हॉस्पिटल निर्जंतुकीकरण  करण्यात येत असून त्यासाठी 48 तास लागतात त्यानंतरच हॉस्पिटल रुग्णांसाठी सोमवारी खुले करण्यात येईल अशी माहिती जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिली.

          या हॉस्पिटल मध्ये थेट प्रवेश दिला जाणार नाही. चाचणी क्रांतीसिंह नाना पाटील रुग्णालय लॅब, किंवा इतर लॅब मध्ये होईल,  डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार  पुढील कार्यवाही होणार असून छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाच्या समोर जे औद्योगिक प्रक्षिक्षण केंद्र आहे तिथे रुग्णाची प्राथमिक तपासणी होईल त्यानंतरच रुग्णाला कोविड हॉस्पिटल मध्ये भरती करून घेण्यात येईल अशी माहितीही जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिली आहे.

No comments