Breaking News

राहुल आणि प्रियंका गांधी यांची हाथरस पीडितेच्या घरी भेट

         राहुल गांधी आणि प्रियंका गांधी  यांच्या समवेत  5 लोकांना पीडित कुटुंबाला भेटण्याची परवानगी दिली होती.  राहुल आणि प्रियंका गांधी यांची बंद खोलीत पीडित कुटुंबाची भेट झाली. यानंतर राहुल गांधीं यांनी न्याय मिळेपर्यंत आपण पीडित कुटुंबासोबत असल्याचे सांगितले. तसेच, यूपी सरकार या कुटुंबाला सुरक्षा देण्यास अयशस्वी असल्याचा आरोप केला.
        राहुल गांधींना 35 खासदारांना बरोबर न्यायचे होते. मात्र पोलिसांनी त्यांना दिल्ली-नोएडा फ्लायवे वर अडवले.  नंतर पोलिसांनी राहुल आणि प्रियंका यांना जाण्याची परवानगी दिली. 

        राहुल गांधी यांनी ट्विटर वर 'ती गोड मुलगी आणि तिच्या कुटुंबासोबत उत्तर प्रदेश सरकार आणि त्यांच्या पोलिसांद्वारे केला जात असलेल्या व्यवहार मला स्वीकार नाही. कोणत्याही हिंन्दुस्तानीने स्वीकार करु नये.' असे ट्विट केले आहे. 
        प्रियंका गांधी यांनी ट्विटर वर, 'यूपी सरकार नैतिकरित्या भ्रष्ट आहे. पीडितेला उपचार मिळाले नाहीत. वेळेवर तक्रार नोंदवण्यात आली नाही. मृतदेह बळजबरीने जाळण्यात आला. कुटुंब कैदमध्ये आहे. त्यांना दाबले जात आहे. आता त्यांना धमकी दिली जातेय की, त्यांची नार्को टेस्ट केली जाईल. हा व्यवहार देशाला स्वीकार नाही. पीडितेच्या कुटुंबाला धमकावने बंद करा.' असे ट्विट केले आहे. 



No comments