फायदेशीर व हानिकार किटकांविषयी कृषीकन्या प्राजक्ता फरांदे यांच्याकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन
गिरवी (गंधवार्ता वृत्तसेवा) - महात्मा फुले कृषी विद्यापीठ संलग्नित रत्नाई कृषी महाविद्यालय, ग्रामीण जागरूकता कार्यनुभव कार्यक्रम अंतर्गत गिरवी येथील कृषीकन्या कु. प्राजक्ता रमेश फरांदे यांनी फायदेशीर व हानिकारक किटकांविषयी माहिती दिली. शेतकऱ्यांसाठी कोणते किटक फायदेशीर असतात व त्या किटकांचे पिकांवर आणि जमिनीवर काय उपयोग होतो याबाबत माहिती दिली.
हानिकारक किटक कोणते असतात व त्यांचे नियंत्रण कसे करावे याचे मार्गदर्शन केले. फायदेशीर कीटकांचा वापर कसा करावा ,त्याचा आपल्याला आर्थिक फायदा कसा होतो याविषयी माहिती त्यांनी शेतकऱ्यांना दिली. त्याचप्रमाणे आपल्याला शेतीला जोड व्यवसाय कसा करता येईल याविषयी मार्गदर्शन गिरवी येथे केले. त्यावेळी गिरवी गावाचे प्रगतशील शेतकरी श्री. चंद्रकांत सुतार तसेच मुबारक काझी, संभाझी कदम, राजेंद्र बोदारे, शरद जाधव, किसन गायकवाड यांच्यासह इतर शेतकरी व महिला उपस्थित होत्या.
या कार्यक्रमासाठी विषय शिक्षक- डॉ.प्रा. वाय. टी. जाधव, प्रा.डी. पी बरकडे यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज अध्यक्ष मा. जयसिंह मोहिते पाटील महाविद्यालयाचाये समन्वयक - डॉ . डी.पी. कोरटकर,प्राचार्य आर. जी. नलवडे, कार्यक्रम समन्वयक प्रा.एस.एम.एकतपुरे ,कार्यक्रम अधिकारी प्रा.एस.आर.अडत, प्रा. डी.एस.मेटकरी यांच्या मार्गदर्शनाने हा कार्यक्रम कु. प्राजक्ता रमेश फरांदे यांनी गिरवी(फलटण) येथे घेतला.
No comments