Breaking News

फलटण तालुक्यात 48 कोरोना पॉझिटिव्ह तर 4 मृत्यू

 

Corona virus phaltan updates : 4 diad  and 48 corona positive 

            फलटण दि. 2 ऑक्टोबर (गंधवार्ता वृत्तसेवा) - जिल्हा प्रशासनाकडून आज 2 ऑक्टोबर 2020 रोजी जाहीर केलेल्या अहवालानुसार, फलटण तालुक्यात आज 48 व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. यामध्ये शहरात 28 व्यक्ती तर ग्रामीण भागात 20 रुग्ण सापडले आहेत. तर 4 व्यक्ती मृत पावल्या आहेत.  असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी गंधवार्ताला दिली आहे.  

फलटण शहरात 28 कोरोना पॉझिटिव्ह

        यामध्ये  , शुक्रवार पेठ 1, रविवार पेठ 2, महातपूरा पेठ 1, भडकमकरनगर 1, ब्राम्हणगल्ली 1, लक्ष्मीनगर 2, खाटीक गल्ली 1, पुजारी कॉलनी 2, हडको कॉलनी 1व फलटण असा पत्ता दिलेले 16 व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. 

 ग्रामीण भागात 20 कोरोना पॉझिटिव्ह 

        यामध्ये    चौधरवाडी 2, दुधेबावी 1, नगरसोबानगर 1, वडगाव 1, झिरपवाडी 1, कोळकी 2, जिंती 1, पाडेगाव 1,  फडतरवाडी 2, साखरवाडी 2,  सांगवी 1, सोनवडी 2, वडगाव 2, वाळूज,वालुथ 1 व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी गंधवार्ताला दिली आहे.

4 रुग्णाचा मृत्यू

        फलटण येथील 55 वर्षीय महिला,  सोनवडी ता. फलटण येथील 60 वर्षीय पुरुष, धुमाळवाडी ता. फलटण येथील 62 वर्षीय पुरुष, बुधवार पेठ ता. फलटण येथील 68 वर्षीय पुरुष, गिरवी ता. फलटण येथील ७५ वर्षीय पुरुष या कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.

No comments