Breaking News

पोलिसांनी ट्रान्सफार्मर चोरट्यांचा बंदोबस्त करावा - मागणी

 

        राजुरी दि. 27 सप्टेंबर (गंधवार्ता वृत्तसेवा) - फलटण तालुक्यात ट्रान्सफार्मर (डिपी) चोरांची मजल दिवसेंदिवस वाढत चालली असून महिनाभरात विस ते पंचविस डिपी चोरीला जात आहेत. पोलिस तपास ही करत आहेत पण चोर काही सापडत नाहीत. ट्रान्सफार्मर चोरीमुळे शेतकरी-यांचे, महावितणचे महिनाभरात पन्नास लाखाच्या आसपास नुकसान होत आहे. 

       ट्रान्सफार्मर मध्ये तांबे व अल्यूमिनीयम धातू असते. या दोन्ही धातूला बाजारपेठेत चांगली किंमत मिळत असल्यामुळे चोर ट्रान्सफार्मर चोरत आहेत , किंवा ट्रान्सफार्मर फोडून त्यामधील ऑइल व तांबे, अल्युमिनियम घेऊन जात आहेत. चोराला एका डिपीमागे भंगार ताब्याच्या तारेचे विस ते पंचविस हजार रुपये मिळत आहेत.
           फलटण ग्रामीण पोलीस यंत्रणा ट्रान्सफार्मर चोरीकडे दुर्लक्ष करीत आसल्याचे दिसत आहे. फलटणच्या निरा उजवा कालवा बागायती पट्ट्यात ट्रान्सफार्मर मोठ्या प्रमाणात आहेत. आणि ट्रान्सफार्मर चोरी देखील जास्त प्रमाणात होत आहे. ट्रान्सफार्मर चोरीमुळे 2 ते 4 दिवस लाईट चा खोळंबा होत आहे. आजचे जग हे लाईट वर अवलंबून आहे, लाईट म्हणजे मूलभूत गरज झाली आहे. लाईट अभावी विद्यार्थी, महिला, युवक, वृद्ध या सर्वांचीच कामे अडत आहेतच परंतु शेतीला पाणी देता येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचा फार मोठा खोळंबा होत आहे. ट्रान्सफॉर्मर चोरी मुळे जनसामान्यांचे तसेच शेतकरी व महावितरण चे फार नुकसान होत आहे.त्यामुळे  पोलिसांनी या चोरट्यांचा त्वरीत बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी वर्गातुन होत आहे.

No comments