सेन्सेक्स व निफ्टी डाऊन

गंधवार्ता वृत्तसेवा (दि. 24 सप्टेंबर 2020) - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ढासळलेली अर्थव्यवस्था, युरोपात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता, कृषि विधेयकांवरून सुरु असलेलं आंदोलन याचा मोठा परिणाम शेअर बाजारांवर आज दिसून आला. आज गुरुवारी सेन्सेक्स १११४ अंकांनी कोसळला आणि ३६५५३ अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजार निफ्टी ३२६ अंकांनी कोसळला. निफ्टी १०८०५ अंकांवर बंद झाला.
आज कारभारादरम्यान शेअर बाजारातील बीएसई इंडेक्सचे सगळे शेअर लाल निशाण्यावर होते. बाजार उघडताच गुंतवणूकदारांनी विक्रीचा सपाटा सुरु केला. संपूर्ण कारभाराच्या शेवटच्या तासात इंडसइंड बँकेचे शेअर ८ टक्क्यांनी घसरले. बजाज फायनान्स, टेक महिंद्रा, टीसीएस, महिंद्रा अँड महिंद्रा या कंपन्यांचे शेअर्सही टॉप लूझर्समध्ये होते. टाटा स्टील, इन्फोसिस, अॅक्सिस बँक, टीसीएस, मारुती, एअरटेल या कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली.
No comments