Breaking News

98 कोरोना पॉझिटिव्ह तर 2 मृत्यू ; फलटण तालुक्यातील उच्चांकी संख्या

Corona virus phaltan updates : 2 diad  and 98 corona positive 

        फलटण दि. 24 सप्टेंबर (गंधवार्ता वृत्तसेवा) - जिल्हा प्रशासनाकडून आज 24 सप्टेंबर 2020 रोजी जाहीर केलेल्या अहवालानुसार, फलटण तालुक्यात आज 98 व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. यामध्ये शहरात 33 व्यक्ती तर ग्रामीण भागात 65 रुग्ण सापडले आहेत. तर 2 व्यक्ती मृत पावल्या आहेत.  असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी गंधवार्ताला दिली आहे. आज सापडलेल्या रुग्णांची संख्या ही दिवसातील सर्वाधिक संख्या आहे.
फलटण शहरात 33 कोरोना पॉझिटिव्ह
        यामध्ये  कसबा पेठ 6, स्वामी विवेकानंद नगर 1,  जलमंदिर जवळ 1,   लक्ष्मीनगर 4, विद्यानगर 1,  रविवार पेठ 4,  धनगर वाडा 1,  संत बापूदास नगर 1, मंळवार पेठ 1, शुक्रवार पेठ 2, गोळीबार मैदान 1, मलठण 3,  सोमवार पेठ 1,  भडकमकरनगर 1 व फलटण असा पत्ता दिलेले 5 व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत.
 ग्रामीण भागात 65 कोरोना पॉझिटिव्ह
         यामध्ये ठाकुरकी 7, साखरवाडी 5, होळ  4 , विडणी 4, शिंदेवाडी 3, फरांदवाडी 3, खामगाव 2, वाठार निंबाळकर 3, कोळकी 3, गिरवी 2, ताथवडा 2,  जिंती 1, दुधेबावी 2, अक्षत नगर 1,  जाधववाडी 2, सोनवडी 1,  झिरपवाडी 1,  बिरदेव नगर 2, शिंदेवस्ती 1,भुजबळ मळा 1,कोऱ्हाळे खु 1, खराडेवाडी 1,  निंभोरे 1, सुरवडी 1, तांबमळा 2, हावळेवाडी 1, आरडगाव 1,सासवड 1,भिलकटी 1, मठाचीवाडी 1, तडवळे 1 निरगुडी 1,तरडगाव 1, सासकल 1 व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी गंधवार्ताला दिली आहे.
2 रुग्णाचा मृत्यू
        ब्राम्हण गल्ली फलटण येथील 54 वर्षीय पुरुष, ताथवडे ता. फलटण येथील 65 वर्षीय पुरुष या कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे

No comments