Breaking News

रिपब्लिकन पक्ष कंगनाच्या पाठिशी'; मंत्री रामदास आठवले यांनी घेतली कंगनाची भेट

 

Ramdas Athavale met actress Kangana Ranaut at her home
        मुंबई, दि. १० : रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी अभिनेत्री कंगना रणौतची तिच्या खारमधील घरी भेट घेतली. या भेटीनंतर रामदास  आठवले म्हणाले की, 'रिपब्लिकन पक्ष कंगनाच्या पाठिशी आहेत. मुंबई सर्वांची आहे. कंगनाला मुंबईत घाबरण्याची गरज नाही.'

        कंगनासोबत झालेल्या भेटीनंतर माध्यमांशी संवाद साधताना आठवले म्हणाले की,  ' कंगनाने मला सांगितलं की, तिच्या ऑफीसमधले फर्निचर, वॉल आणि इतर सामनाची तोडफोड करण्यात आली. याविरोधात ती न्यायालयात धाव घेणार आहे. कंगनासोबत माझी खूप विषयावर चर्चा झाली. कंगनाला झालेल्या त्रासाबद्दल मी मुख्यमंत्र्याची भेट घेणार आहे,' असे आठवले म्हणाले.

        महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेल्या संविधनावर माझी पूर्ण  श्रद्धा विश्वास असल्याचे आज अभिनेत्री कंगना राणावत यांनी मला सांगितले. त्यांना रिपाइं चा पाठिंबा मिळाल्याबद्दल धन्यवाद मानले.

No comments