व्यापारी संघटनांनी पुकारलेला फलटण बंद रद्द

फलटण दिनांक 11 सप्टेंबर (गंधवार्ता वृत्तसेवा) - कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी, फलटण मधील व्यापारी संघटनांनी एकत्रित येऊन दिनांक 12 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर पर्यंत फलटण बंद करण्याचे नियोजन केले होते. परंतु आज व्यापारी संघटनांच्या बैठकीत, सदरचा जनता कर्फ्यू (फलटण बंद) पुढे ढकलण्यात आले असल्याचे व्यापारी संघटनांनी कळवले आहे, त्यामुळे फलटणमध्ये करण्यात आलेला दिनांक 12 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर पर्यंतचा नियोजित बंद (फलटण बंद) मागे घेण्यात आला आहे.
फलटणमधील व्यापारी संघटनांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात असे म्हटले आहे की, रविवार दि. ६ सप्टेंबर २०२० रोजी फलटण शहरातील सर्व व्यापारी संघटनांची कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनता कर्फ्यू करणेबाबत मिटींग आयोजित करण्यात आली होती. या मिटींगमध्ये दि. १२ ते १७ सप्टेंबर या कालावधीत जनता कर्फ्यूचे आयोजन करण्याचा निर्णय करण्यात आला होता.
परंतू काही अपरिहार्य कारणामुळे सदरचा पुकारलेला (जनता कर्फ्यू) फलटण बंद करण्याचा निर्णय व्यापारी संघटनांनी मागे घेतला आहे. तसेच यापुढे कधीही कोरोना महामारीच्या प्रतिबंधासाठी शासनाने जनता कयूंचे आदेश दिल्यास, त्यात फलटण शहरातील सर्व व्यापारी संघटना सहभागी होतील. तूर्तास दि. १२ ते १७ सप्टेंबर २०२० रोजी करण्यात येणाऱ्या जनता कर्फ्यूचे (फलटण बंद) आयोजन रद्द करीत आहोत.
प्रसिद्धीपत्रकावर फलटण शहरातील सर्व व्यापारी संघटना यामध्ये, फलटण तालुका व्यापारी वेल्फेअर असोसीएशन अध्यक्ष मंगेशशेठ दोशी, फलटण व्यापारी असोसिएशन अध्यक्ष दिगंबर कुमठेकर, फलटण बिल्डर असोसिएशन अध्यक्ष प्रमोद निंबाळकर, फलटण व्यापारी असोसिएशन अध्यक्ष वसीम मणेर, फलटण तालुका मोबाइल असोसिएशन अध्यक्ष अनिल शिरतोडे यांच्या सह्या आहेत.
No comments