Breaking News

कोरोनाची भीती काढून, कुटुंबीयांची तपासणी करून घ्या - श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर

तरडगाव येथे माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेचा शुभारंभ
माझे कुटुंब माझी जबाबदारी अभियानाचा शुभारंभ प्रसंगी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, आ. दीपक चव्हाण, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर,  उपसभापती सुरेखा खरात, गट विकास अधिकारी सौ गावडे व इतर

    My family, My Responsibility campaign  launches at Tardgaon ,Phaltan
        तरडगाव दि. 15 सप्टेंबर (संजय किकले) -  माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेचा फलटण तालुक्यात तरडगाव येथे विधान परिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी फलटण कोरेगाव मतदार संघाचे आमदार दीपकराव चव्हाण, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, पंचायत समिती उपसभापती सुरेखा खरात, गट विकास अधिकारी सौ गावडे मॅडम तसेच वसंतकाका, सरपंच, उपसरपंच, विविध गावचे पदाधिकारी उपस्थित होते.

        माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेचा शुभारंभ प्रसंगी बोलताना श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर म्हणाले की, कोरोनाची भीती सर्वांनाच लागलेली आहे, साथीच्या रोगांवर आपण जसे घरगुती उपाय  किंवा दवाखान्यातून एखादे इंजेक्शन घेऊन त्यावर उपाय करतो, त्याचप्रमाणे कोरोनाचे नियम पाळून, आपण कोरोनावर मात करू शकतो. त्यामुळे कोरोना बाबत असणारी मनातील भीती काढून, आपल्या कुटुंबीयांची  कोरोना चाचणी करून घ्यावी, कोरोना व्हायरसशी लढत लढत आपण जगायला शिकले पाहिजे. 

        साधा सर्दी, खोकला, ताप असला तरीसुद्धा कोरोनाची टेस्ट करून, आपले कुटुंब सुरक्षित ठेवावे, सर्वांची काळजी घ्यावी, आपली आपण काळजी घेतली तरच आपण कोरोना मुक्तीच्या वाटेकडे जाऊ.  यासाठी आपल्या गावात प्रशासनाच्या समितीबरोबर ग्रामपंचायत सरपंच सदस्यानी व कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन माहिती जमा करून,  प्रशासनाला व मला पाठवावी.  लोकसहभागाशिवाय हे अभियान पूर्णत्वास जाणार नाही, असे सांगतानाच,  लोकसहभगाचा कॉलम  सर्वेक्षणामध्ये नसेल तर त्याचा एक सेपरेट कॉलम तयार करून लोक सहभाग समाविष्ट करण्यात यावा अशा सूचना श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर यांनी गट विकास अधिकारी गावडे मॅडम यांना दिल्या. 
 
        माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेच्या शुभारंभ कार्यक्रमाचे  प्रास्ताविक डॉ. कदम यांनी केले तर संतोष कुंभार ग्रामपंचायत सदस्य यांनी आभार मानले.

No comments