पालखी महामार्ग भ्रष्टाचाराची सीबीआय चौकशी व्हावी- खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर

गंधवार्ता वृत्तसेवा (दि. 23 सप्टेंबर) - माढा मतदार संघात जमीन अधिग्रहण करताना नगर पंचायत जमिनीला एक दर व त्याच्या जवळ 100 मीटर वर असणाऱ्या जमिनीस जादा मोबदला मिळत आहे, हा भेदभाव कशासाठी याची चौकशी करण्यात यावी तसेच महामार्ग निर्मतीमध्ये मोठया प्रमाणात भ्रष्टाचार चालू आहे त्याची सीबीआय चौकशी करण्यात यावी अशी आग्रही मागणी माढा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी अधिवेशनात केली.
आळंदी- पंढरपूर असा NH965 हा 250 किमी चा महामार्ग मंजूर झाला असून, यासाठी जमीन अधिग्रहण करणेचे प्रक्रिये मध्ये दिला जाणारा जमिनीचा मोबदल्यामध्ये भेदभाव केला जात आहे, माळशिरस तालुक्यात एक गुंठा जमिनीला एक लाख रुपये दर तर तिथूनच 100 मीटर वर 4 लाख रुपये दर दिला जात आहे. तरी हा भेदभाव मिटवून सर्व शेतकऱ्यांना समान दर देण्यात यावा असे निवेदन करून, महामार्ग निर्मिती प्रक्रियेत सांगोला, माढा, करमाळा, सांगोला येथील अधिकार्यांकडून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू आहे त्याची सीबीआय चौकशी करण्यात यावी अशी मागणी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी संसदेत केली.
माढा मतदारसंघात माळशिरस परीसरातील शेतकरी बांधवांना, अधिग्रहण प्रक्रियेत योग्य मोबदला मिळत नाही, तसेच या प्रक्रियेत अधिकाऱ्यांच्या कडून भ्रष्टाचार सुरू असल्याच्या तक्रारी खासदार रणजितसिंह यांच्याकडे शेतकरी व ग्रामस्थ यांच्याकडून होत होत्या. त्या संदर्भातच आज लोकसभेत खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी प्रश्न उपस्थित करून चौकशीची मागणी केली.
No comments