... त्यांनी करोनाशी लढाई लढावी, ना विरोधी पक्षासोबत ना कंगनासोबत - देवेंद्र फडणवीस

Maharashtra Government must fight with Corona first! - Devendra Fadnavis
“आज महाराष्ट्रात करोनाचं मोठं संकट आहे. आजघडीला १० लाखांपेक्षा जास्त करोनाचे रुग्ण आहेत. देशात करोनामुळे झालेल्या एकूण मृत्यूपैकी चाळीस टक्के मृत्यू महाराष्ट्रातील आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्रात दिवसाला २३ ते २५ हजार रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे मला वाटतंय की आमच्या मुख्यमंत्र्यांनी करोनाच्या संकटावर अधिक लक्ष दिलं पाहिजे. राजकारण, कंगनाचा विषय किंवा त्यांच्या पक्षाच्या लोकाकडून नेव्ही अधिकाऱ्यावर झालेला हल्ला, ज्या प्रकारचा गुंडाराज चालवण्याचा प्रयत्न सुरू आहे या सगळ्या गोष्टींकडे त्यांचं लक्ष असलं पाहिजे. महत्त्वाचं म्हणजे सगळ्यात आधी त्यांनी करोनाशी लढाई लढावी. ना विरोधी पक्षासोबत वा कंगनासोबत,” अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

No comments