मला न्याय मिळावा - कंगना रणौत ; राज्यपाल भगतसिंग कोश्यारींची घेतली भेट

मुंबई: शिवसेनेशी झालेला वाद आणि मुंबई महापालिकेने कार्यालयावर केलेली कारवाई या पार्श्वभूमीवर अभिनेत्री कंगना रणौत यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली.
राज्यपालांकडे मी माझी कैफियत मांडली आहे. माझ्यावर अन्याय झाला असून राज्यपालांनीही माझं म्हणणं ऐकून घेतलं आहे. त्यामुळे मला न्याय मिळेल अशी आशा आहे, असं कंगना राणावतने सांगितलं.राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याशी सुमारे २० मिनिटं चर्चा केल्यानंतर कंगनाने मीडियाशी संवाद साधला. यावेळी तिने ही प्रतिक्रिया व्यक्त केली. राज्यपालांना भेटून मी माझी कैफियत मांडली आहे. गेल्या काही दिवसात ज्या पद्धतीने मला वागणूक दिली गेली. त्याची संपूर्ण माहिती राज्यपालांनी दिली आहे. राज्यपालांनीही मुलीप्रमाणे माझं म्हणणं ऐकून घेतलं असून मला अश्वस्त केलं आहे, असं कंगनाने सांगितलं.
मी महाराष्ट्राचे राज्यपाल श्री भगतसिंग कोश्यारीजी यांना भेटले. गेल्या काही दिवसात ज्या पद्धतीने मला वागणूक दिली गेली. त्याची संपूर्ण माहिती राज्यपालांनी दिली आहे. मी त्यांना माझा दृष्टिकोन समजावून सांगितला आणि अशी विनंती केली की मला न्याय मिळावा, मला आशा आहे की मला न्याय मिळेल, ज्यामुळे सर्वसामान्य नागरिक आणि विशेषतः मुलींचा व्यवस्थेवर विश्वास वाढेल. भेट झाल्यांनातर कंगना रणौत यांनी ट्विटरच्या माध्यमातून अशी प्रतिक्रिया दिली.
No comments