मुंबईत पाच दिवस राहिल्यानंतर अभिनेत्री कंगना रणौत सोमवारी सकाळी बहीण रंगोलीसह मनालीला रवाना झाली. मनालीला रवाना होण्यापूर्वी कंगनाने दोन ट्विटमधून महाराष्ट्र सरकारवर निशाणा साधला आहे. तसेच चंदिगढ येथे गेल्यावर देखील कंगणाने ट्विट केले आहे.
मुंबई सोडण्यापूर्वी कंगनाने ट्विटमध्ये म्हटले की, “मी जड अंतःकरणाने मुंबई सोडत आहे, या दिवसात मला सतत एक प्रकराची दहशत वाटली. माझ्या कामाचे ठिकाण उद्धवस्त केल्यानंतर आता माझे राहते घर तोडण्याचा प्रयत्न सुरु झाला आहे, सततचे हल्ले आणि शिवीगाळ केली गेली. माझ्याभोवती सावध सुरक्षा होती. पीओकेबद्दलचा माझा मुद्दा बरोबर होता, असे म्हणायला हरकत नाही.'
चंदिगढ येथे गेल्यावर कंगनाने ट्विटमध्ये म्हटले की, मी चंदीगडला येताच माझी सुरक्षा फक्त नाममात्र राहिली आहे, लोक आनंदाने माझे अभिनंदन करीत आहेत, असे वाटते आहे की, या वेळी मी वाचले आहे, असा एक दिवस होता जेव्हा मला मुंबई मध्ये आईच्या पदराची शीतलता जाणवत होती, पण आज असे म्हणावे लागत आहे, माझा जीव वाचला, हेच भाग्य आहे. शिवसेनेची सोनिया सेना होताच मुंबईत दहशतवादी कारभाराचा बोलबाला सुरू झाला.
कंगनाचे मुंबईत 3 फ्लॅट
कंगना मुंबईतील खार (पश्चिम) राहते. ऑरकिड ब्रिजच्या 16 क्रमांच्या एका इमारतीच्या 5 व्या मजल्यावर तिचे 3 फ्लॅट आहेत. एक फ्लॅट 797 चौरस मीटर, दुसरा फ्लॅट 711 चौरस मीटर आणि तिसरा फ्लॅट 459 चौरस मीटरचा आहे. 8 मार्च 2013 रोजी या तिन्ही फ्लॅटची कंगनाच्या नावावर नोंद झाली आहे. कंगनाने हे फ्लॅट घेतल्यानंतर 5 वर्षांनी 13 मार्च 2018 रोजी बीएमसीला या फ्लॅट्समध्ये बेकायदेशीर बांधकाम केलेले आढळले. याबाबतच्या तक्रारीनंतर 26 मार्च 2018 मध्ये बीएमसीकडून कंगनाच्या फ्लॅट्सची पाहणी करण्यात आली. त्याच दिवशी कंगनाला बीएमसीने बेकायदेशीर बांधकाम प्रकरणी नोटीस दिली.
No comments