आइटम नम्बर्ज़ और एक रोमांटिक सीन मिलता था वो भी हिरोके साथ सोने के बाद...- कंगना

समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन यांनी राज्यसभेत बॉलिवूडमधील ड्रग्जच्या मुद्यावर विधान केले. यावरुन वाद वाढत आहेत. त्यानंतर महाराष्ट्र सरकारने मुंबईत अमिताभ बच्चन यांच्या घराची सुरक्षा वाढवली. दुसरीकडे अभिनेत्री कंगना रणौतने सलग दुसर्या दिवशी जया बच्चन यांच्यावर पलटवार केला आहे.
कंगनाने जया बच्चन यांच्यावर निशाणा साधत आणखी एक ट्विट केलं आहे. बॉलिवूड इंडस्ट्रीनं कोणती 'थाळी' दिलीए, असं म्हणत कंगनानं जया बच्चन यांना प्रत्युत्तर दिलं आहे. जयाजी आणि त्यांच्या इंडस्ट्रीनं कुठली थाळी दिलीए, एक थाळी मिळत होती. ज्यामध्ये दोन मिनिटांचं आयटम नंबर आणि एक रोमॅंन्टीक सीन मिळत होता. तो देखील हिरोसोबत झोपल्यानंतर...मी इंडस्ट्रीला स्त्रीवाद शिकवलाय. माझी थाली स्वत: देशभक्ती आणि महिलाप्रधान चित्रपटांनी सजवलीए. त्यामुळं ही माझी थाळी आहे, जयाजी तुमची नाही', असं आणखी एक वादग्रस्त ट्विट कंगनानं केलं आहे.
कौन सी थाली दी है जया जी और उनकी इंडस्ट्री ने? एक थाली मिली थी जिसमें दो मिनट के रोल आइटम नम्बर्ज़ और एक रोमांटिक सीन मिलता था वो भी हेरो के साथ सोने के बाद,मैंने इस इंडस्ट्री को फ़ेमिनिज़म सीखाया,थाली देश भक्ति नारीप्रधान फ़िल्मों से सजाई,यह मेरी अपनी थाली है जया जी आपकी नहीं।
No comments