Breaking News

मुंबईत मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत

 

        गंधवार्ता वृत्तसेवा (दि. 23 सप्टेंबर) - मुंबईत मंगळवारी संध्याकाळपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईतील अनेक भागांमध्ये पाणी साचलं आहे. मंगळवार रात्रीपासून मुंबईत २८६.४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. हा एवढा पाऊस अतीवृष्टीमध्ये गणला जातो. मुंबई आणि उपनगर परिसरामध्ये मंगळवारी रात्रीपासून संततधार सुरु होती. मात्र रात्री साडेतीन नंतर विजांच्या गडगडाटांसहीत जोरदार पाऊस सुरु झाला. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचल्याने रस्ते वाहतुकीबरोबरच रेल्वे वाहतुकीवरही याचा परिणाम झाला. मुंबई सेंट्रल परिसरातील  नायर रुग्णालयात गुडघाभर पाणी शिरले. यामुळे प्रशासनाची दाणादाण उडाली. . मध्य रेल्वे मार्गावरील सायन स्टेशन येथे मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून रेल्वेरूळ पूर्णपणे पाण्याखाली गेले आहेत. पावसानं मुंबईकरांच जनजीवन विस्कळीत केलं आहे.

         सकाळी ५.३० वाजेपर्यंत कुलाबा येथे १२२.२ मिलीमीटर तर सांताक्रुझ येथे २७३.६ मिलीमीटर पावसाची नोंद झाल्याची माहिती  भारतीय हवामान खात्याच्या मुंबई केंद्राचे उपमहासंचालक यांनी  दिली. मुंबईत मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं असून रेल्वेसेवरही त्याचा परिणाम झाला आहे. चर्चगेट ते अंधेरी दरम्यान मुसळधार पावसामुळे रेल्वे रुळांवर पाणी साचल्यानं या स्थानकांदरम्यान रेल्वे सेवा ठप्प झाली आहे. दरम्यान  आजही मुंबई, ठाणे आणि पालघर परिसरात मुसळधार पाऊस कोसळणार असल्याची माहिती भारतीय हवामान खात्याच्या मुंबई केंद्राचे उपमहासंचालक के. एस. होसळीकर यांनी दिली. त्यांनी ट्विटद्वारे याविषयी माहिती दिली आहे. 


No comments