जोहरा सेहगल यांच्या स्मरणार्थ गूगलचे डूडल

Google's doodle in memory of Johra Sehgal
गंधवार्ता वृत्तसेवा (दिनांक 29 सप्टेंबर 2020) - गूगलने (google) आज मंगळवार दि. 29 सप्टेंबर 2020 रोजी आयकॉनिक भारतीय अभिनेत्री जोहरा सेहगल (Actress Zohara Sehgal) यांच्या स्मरणार्थ डूडल तयार केले आहे. जोहरा सेहगल आंतरराष्ट्रीय स्तरावरील नावाजलेल्या नर्तक आणि नृत्यदिग्दर्शक व अभिनेत्री होत्या. दि. 29 सप्टेंबर 1946 रोजी जोहरा सेहगल यांचा 'नीचा नगर' हा चित्रपट कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये प्रदर्शित झाला. 'नीचा नगर' चित्रपटाने कान्स फिल्म फेस्टिव्हलचा सर्वात मोठा पुरस्कार पाल्मे डी ऑर जिंकला. जोहरा सेहगल या अशा अभिनेत्री होत्या की त्यांचा उत्साह कधीही कमी झाला नाही, त्यामुळे त्या कधीही वृध्द वाटल्या नाहीत. हिंदी चित्रपटसृष्टी ही त्यांच्याकडे उत्साही कलाकार म्हणूनच पहात आलेली आहे.
सन 1998 मध्ये त्यांना पद्मश्री, 2001 मध्ये कालिदास पुरस्कार आणि 2010 मध्ये पद्मविभूषण या पुरस्काराने झोहरा सेहगल यांना सन्मानित करण्यात आले. Google गुगल महान व्यक्तीची आठवण ठेवून दररोज डूडल बनवत असते. गुगल (google) महान व्यक्तींच्या स्मृतींना उजाळा देत वेगवेगळ्या प्रकारचे डुडल (doodle) तयार करून एक प्रकारे महान व्यक्तींना श्रद्धांजली देत असते. गुगलने जोहरा सेहगल यांच्या स्मरणार्थ डूडल प्रसिद्ध केल्यानंतर सोशल मीडियावर यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

जोहरा सेहगल यांचा जन्म 27 एप्रिल 1912 रोजी सहारनपूर येथे मुस्लिम कुटुंबात झाला होता. त्यांच्या बालपणीचे नाव साहेबझादी जोहरा बेगम मुमताज उल्ला खान असे होते. जोहरा यांना लहानपणी पासूनच नृत्याची आवड होती. त्यांनी हळूहळू नृत्य व अभिनय हेच आपले करिअर बनवले. जोहरा यांनी पृथ्वीराज कपूर ते रणबीर कपूर पर्यंत काम केलेले आहे. कपूर खानदानातील चारही पिढ्यांबरोबर काम करणाऱ्या त्या एकमेव अभिनेत्री होत्या. बॉलीवूड च्या सर्व आघाडीच्या कलाकारांसोबत चित्रपटामध्ये त्यांनी काम केले आहे.
![]() |
'चीनी कम' मध्ये अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या समवेत जोहरा |
![]() |
'सावरिया' मध्ये अभिनेते रणबीर कपूर यांच्या समवेत जोहरा सेहगल |
No comments