Breaking News

गिरवी येथे कृषिकन्येकडून बीजप्रक्रियेचे प्रात्यक्षिक

 

        फलटण दि. 12 सप्टेंबर (गंधवार्ता वृत्तसेवा) - महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्नित व रत्नाई कृषी महाविद्यालय अकलूज संचलित ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रमाचे आयोजन गिरवी तालुका-फलटण येथे करण्यात आले होते. या दरम्यान महाविद्यालयाचे कृषिकन्या प्राजक्ता रमेश फरांदे यांच्याकडून शेतकऱ्यांना बीजप्रक्रियेचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. बी पेरणीनंतर त्यावर जमिनीमधील विविध कीटक तसेच बुरशींचा प्रादुर्भाव होऊ शकतो व पिक उगवण्यास अडचण येऊ शकते त्यामुळे पिकाच्या उत्पादनात घट होऊन शेतकऱ्यांना मोठ्या संकटाला सामोरे जावे लागते. यापासून बचाव करण्यासाठी पेरणीच्या अगोदर त्यावर रासायनिक किंवा जैविक बीजप्रक्रिया करणे अत्यंत गरजेचे आहे. रासायनिक बुरशीनाशकांचा वापर ऐवजी जैविक बुरशीनाशके वापरण्याचा सल्ला कृषीदूताने या ठिकाणी दिला. या कार्यक्रमासाठी विषय शिक्षक प्राध्यापक डी. एस. ठवरे यांचे मार्गदर्शन लाभले.
        शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज चे अध्यक्ष- मा.जयसिंह मोहिते-पाटील, महाविद्यालयाचे समन्वयक- डाॅ.डी.पी.कोरटकर,प्राचार्य- आर.जी. नलावडे ,कार्यक्रम समन्वयक-प्रा.एस.एम.एकतपुरे, कार्यक्रम अधिकारी- प्रा. एस. आर. आडत, प्रा.डी.एस.मेटकरी यांच्या मार्गदर्शनाने कृषिकन्या प्राजक्ता फरांदे. यांच्यामार्फत ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम गिरवी येथे घेण्यात येत आहे.

No comments