80 कोरोना पॉझिटिव्ह फलटण तालुक्यात तर 1 मृत्यू

फलटण दि. 15 सप्टेंबर (गंधवार्ता वृत्तसेवा) - जिल्हा प्रशासनाकडून आज 15 सप्टेंबर 2020 रोजी जाहीर केलेल्या अहवालानुसार, फलटण तालुक्यात आज 80 व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. यामध्ये शहरात 40 व्यक्ती तर ग्रामीण भागात 40 रुग्ण सापडले आहेत. तर 1 व्यक्ती मृत पावली असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी गंधवार्ताला दिली आहे.
फलटण शहरात 40 कोरोना पॉझिटिव्ह
यामध्ये मंगळवार पेठ 5, लक्ष्मीनगर 5, भडकमकरनगर 4, कसबा पेठ 3, बुधवार पेठ 2, सोमवार पेठ 1, शुक्रवार पेठ 1, स्वामी विवेकानंद नगर 2, गिरवी रोड फलटण 1, महतपुरा पेठ 1, शिवाजीनगर 2, विद्यानगर 1, गोळीबार मैदान 1, गिरवी नाका फलटण 1, मलटण 2, धनगरवाडा 1 आणि फलटण असा पत्ता दिलेल्या 7 व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत.
ग्रामीण भागात 40 कोरोना पॉझिटिव्ह
यामध्ये जाधववाडी 7, निसरे 1, चौधरवाडी 1, खटकेवस्ती 1, साखरवाडी 1, झीरपवाडी 1, कोळकी 2, झडकबाईची वाडी 2, बीरोबा नगर 1, धुळदेव 1, दातेवस्ती 1, राजुरी 1, चव्हाणवाडी 1, खामगाव 1, महादेवनगर 1, जावळी 1, तामखाडा 1, गिरवी 1, विडणी 2,तरडगाव 2, सस्तेवाडी 1, मिरेवाडी 1, सासकळ 1,वडले 1, कोळकी 1, निंभोरे 1, पवार वस्ती 1, पिंप्रद 1, होळ 1, सासकल 1 व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी गंधवार्ताला दिली आहे.
1 रुग्णाचा मृत्यू
विडणी ता. फलटण येथील 48 वर्षीय महिला या कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे. https://www.gandhawarta.com/
No comments