Breaking News

फलटण तालुक्यात 63 कोरोना पॉझिटिव्ह ; 1 मृत्यू

 

        फलटण दि. 11 सप्टेंबर (गंधवार्ता वृत्तसेवा) - जिल्हा प्रशासनाकडून आज 11 सप्टेंबर 2020 रोजी जाहीर केलेल्या अहवालानुसार फलटण तालुक्यात आज 63 व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. यामध्ये शहरात 29 व्यक्ती तर ग्रामीण भागात 34 रुग्ण सापडले आहेत. तर 1 व्यक्ती मृत पावली असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

फलटण शहरात 29 कोरोना पॉझिटिव्ह
        यामध्ये मलठण 3, लक्ष्मीनगर 2, पद्मावतीनगर 1, विद्यानगर फलटण 1,कसबा पेठ  2, मलटण 1, भडकमकरनगर 1, शिवाजीनगर फलटण 1,  बारवबाग फलटण 1, रविवार पेठ 1, विद्यानगर 1, फलटण असा पत्ता दिलेले  14 व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत.

 ग्रामीण भागात 34 कोरोना पॉझिटिव्ह
     यामध्ये खटकेवस्ती 6, विडणी 6, कोळकी 5, प्रिंप्रद 3, मिरेवाडी 4,   बागेवाडी 3,  मिरेवाडी 1,  आसु 1, सस्तेवाडी 1,   साखरवाडी 1, माळेवाडी 1,   कालढण 1, जिंती 1 व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत.

1 रुग्णाचा मृत्यू
शिवाजीनगर फलटण येथील 70 वर्षीय महिला या कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे,   असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.

No comments