81 कोरोना पॉझिटिव्ह फलटण तालुक्यात तर 2 मृत्यू

Corona virus Phaltan updates : 2 died and 81 corona positive
फलटण दि. 25 सप्टेंबर (गंधवार्ता वृत्तसेवा) - जिल्हा प्रशासनाकडून आज 25 सप्टेंबर 2020 रोजी जाहीर केलेल्या अहवालानुसार, फलटण तालुक्यात आज 81 व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. यामध्ये शहरात 35 व्यक्ती तर ग्रामीण भागात 46 रुग्ण सापडले आहेत. तर 2 व्यक्ती मृत पावल्या आहेत. असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी गंधवार्ताला दिली आहे. आज सापडलेल्या रुग्णांची संख्या ही दिवसातील सर्वाधिक संख्या आहे.
फलटण शहरात 35 कोरोना पॉझिटिव्ह
यामध्ये मलटण 5, कसबा पेठ 3, लक्ष्मीनगर 3, शुक्रवार पेठ 1, रविवार पेठ 1,शिवाजी नगर 2, विवेकानंद नगर 2, सगुनामाता नगर 1, हडको कॉलनी 1, गजानन चौक 1, पोलीस कॉलनी 2, उमाजी नाईक चौक 1, मारवाड पेठ 1 व फलटण असा पत्ता दिलेले 11 व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत.

ग्रामीण भागात 46 कोरोना पॉझिटिव्ह
यामध्ये धुळदेव 12, तरडगाव 4, ढवळ 4, बिरदेवनगर 3, खुंटे 3, गोखळी 2, राजुरी 3, साखरवाडी 2, सुरवडी 2, सोनगाव 1, कोळकी 2, मुंजवडी 1, सस्तेवाडी 1, फडतरवाडी 1,निंबळक 1, चवारवाडी 1, दुधेबावी 1, विडणी 2 व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी गंधवार्ताला दिली आहे.
2 रुग्णाचा मृत्यू
बुधवार पेठ फलटण येथील 78 वर्षीय पुरुष, धुळदेव ता. फलटण येथील 83 वर्षीय पुरुष, या कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.
No comments