फलटण तालुक्यात 62 कोरोना पॉझिटिव्ह तर 1 मृत्यू

Corona virus phaltan updates : 1 diad and 62 corona positive
फलटण दि. 23 सप्टेंबर (गंधवार्ता वृत्तसेवा) - जिल्हा प्रशासनाकडून आज 23 सप्टेंबर 2020 रोजी जाहीर केलेल्या अहवालानुसार, फलटण तालुक्यात आज 62 व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. यामध्ये शहरात 38 व्यक्ती तर ग्रामीण भागात 24 रुग्ण सापडले आहेत. तर 1 व्यक्ती मृत पावली असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी गंधवार्ताला दिली आहे.

फलटण शहरात 38 कोरोना पॉझिटिव्ह
यामध्ये लक्ष्मीनगर 4, महतपुरा पेठ 3, मलठण 3, हाडको कॉलनी 1,रविवार पेठ 2, स्वामी विवेकानंद नगर 2, दत्त्नगर 1, खाटीक गल्ली 1, मंगळवार पेठ 1,रिंगरोड 2, पोलिस कॉलनी 1,जलमंदिर 1 व फलटण असा पत्ता दिलेले 16 व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत.
ग्रामीण भागात 24 कोरोना पॉझिटिव्ह
यामध्ये कोळकी 3, ठाकुरकी 2, सांगवी 1, जाधववाडी 3, मठाचीवाडी 2, कोरेगाव 1, माळेवाडी 1, राजाळे 1, गुरसाळे 2, धुळदेव 1, गुणवरे 1, फारांदवाडी 1, वाठार निंबाळकर 1, होळ 1, निंभोरे 1, पिंप्रद 1, आदर्की 1 व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी गंधवार्ताला दिली आहे.
1 रुग्णाचा मृत्यू
कोळकी फलटण येथील 78 वर्षीय पुरुष, या कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.
No comments