थोडासा दिलासा : फलटण तालुक्यात 20 कोरोना पॉझिटिव्ह तर 1 मृत्यू

Corona virus phaltan updates : 1 diad and 20 corona positive
फलटण दि. 28 सप्टेंबर (गंधवार्ता वृत्तसेवा) - जिल्हा प्रशासनाकडून आज 28 सप्टेंबर 2020 रोजी जाहीर केलेल्या अहवालानुसार, फलटण तालुक्यात आज 20 व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. यामध्ये शहरात 11 व्यक्ती तर ग्रामीण भागात 09 रुग्ण सापडले आहेत. तर 1 व्यक्ती मृत पावल्या आहेत. असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी गंधवार्ताला दिली आहे. दरम्यान आज आलेल्या रिपोर्टमध्ये फलटण तालुक्यात सापडणाऱ्या बधितांची संख्या कमी झाल्याने थोडासा दिलासा मिळाला आहे.

No comments