Breaking News

देशात एका दिवसात ९६,५५१ नवे करोना रुग्ण

 

        नवी दिल्ली :  आरोग्य मंत्रालयाच्या अधिकृत आकडेवारीनुसार, गुरुवारी देशात रेकॉर्डब्रेक ९६ हजार ५५१ रुग्णांची भर पडलीय तर एकाच दिवशी तब्बल १२०९ जणांनी करोनामुळे आपले प्राण गमावलेत. याचसोबत देशातील एकूण रुग्णांची संख्या ४५ लाख ६२ हजार ४१५ वर पोहचलीय. 

        एकूण रुग्णांच्या संख्येपैंकी ९ लाख ४३ हजार ४८० जणांवर उपचार सुरू आहेत. भारतात आत्तापर्यंत ३५ लाख ४२ हजार ६६४ रुग्णांनी करोनावर मात केलीय तर भारतात करोनामुळे मृत्यू पावलेल्या रुग्णांची एकूण संख्या ७६ हजार २७१ वर पोहचलीय
भारतातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या ४५ लाखांच्या पुढे गेली आहे तर मृत्यूची संख्या ७६ हजार २७१ इतकी झाली आहे. महाराष्ट्र, तामिळनाडू, आंध्रप्रदेश,कर्नाटक, उत्तर प्रदेश आणि दिल्ली या सहा राज्यात करोनाचा प्रादुर्भाव सर्वात आधिक आहे. 

        एकूण सक्रीय रुग्णांपैकी 74 % रुग्णसंख्या ही सर्वाधिक बाधित 9 राज्यांमधून आहे. एकूण सक्रीय रुग्ण संख्येपैकी 49 % रुग्णसंख्या महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश येथील आहे. सरासरी पाहता महाराष्ट्रात सर्वाधिक म्हणजे 2,50,000 पेक्षा अधिक तर कर्नाटक आणि आंध प्रदेश येथे प्रत्येकी 97,000 पेक्षा अधिक रुग्णसंख्या आहे.
            गेल्या 24 तासात एकूण 1,172 मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यापैकी काल 32 % म्हणजे 380 मृत्यूंची नोंद महाराष्ट्रात झाली तर कर्नाटकमध्ये 128 आणि तामिळनाडूमध्ये 78 मृत्यूंची नोंद झाली.

        एकूण मृत्यूंपैकी, 69 % रुग्णांचे मृत्यू हे महाराष्ट्र, तामिळनाडू, कर्नाटक, दिल्ली आणि आंध्रप्रदेश या पाच राज्य / केंद्रशासित प्रदेशांमध्ये झाले आहेत.

No comments