सातारा जिल्ह्यात 576 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज

576 corona patients discharged today in Satara district
सातारा दि. 29 : जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 576 नागरिकांना घरी सोडण्यात आले असून 822 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
822 जणांचे नमुने पाठविले तपासणीला
स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 104, कराड 19, उपजिल्हा रुग्णालय फलटण 41, कोरेगाव 76, वाई 91, खंडाळा 44, रायगांव 89, पानमळेवाडी 115, मायणी 14, महाबळेश्वर 60, दहिवडी 16, खावली 17 व कृष्णा मेडीकल कॉलेज कराड 136 असे एकूण ८२२ जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहे, अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
घेतलेले एकूण नमुने -- 139776
एकूण बाधित -- 36617
घरी सोडण्यात आलेले --- 27073
मृत्यू -- 1117
उपचारार्थ रुग्ण -- 8427
No comments