सोमंथळी ग्रामसेवकाच्या कारभाराची चौकशी करण्याची मागणी

सोमंथळी दि. 29 ऑगस्ट (गंधवार्ता वृत्तसेवा) - ग्रामपंचयात सोमंथळी ता. फलटण येथील ग्रामसेवकाच्या कारभाराची चौकशी व्हावी असे निवेदन अतिरिक्त गटविकास अधिकारी मदमले यांना देण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, सोमंथळी ग्रामपंचायतीत ग्रामविकास अधिकारी पदावर काम करत असलेले ग्रामविकास अधिकारी प्रभाकर लंगुटे हे आपल्या कारभाराबाबत अस्पष्ट भुमिका घेत आहेत. दिनांक २५ ऑगस्ट २०२० रोजीच्या मासिक मिटींगच्या वेळी प्रोसेसिंग बुक मध्ये कोरम अभावी तहकूब मिटींगाबाबत काही सदस्यांच्या सह्या घेऊन, तहकूब मिटींगची पुर्ण हजेरी दाखविण्यात आली आहे. याबाबत ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय यादव, आनंद अहिवळे, नितिन शिपकुले यांनी विचारणा केली असता. लंगुटे हे केवळ उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. जावू द्या सह्या केल्यातर कुठे बिघडतयं, तुम्हाला काय फरक पडतोय, ॲडजेस्ट करू. अशी उत्तरे दिल्याचे निवेदनात म्हटले आहे.
ग्रामविकास अधिकारी प्रभाकर लंगुटे यांची चौकशी व्हावी, तसेच मिटींग संपलेची प्रोसेडिंग ची प्रत त्वरीत देण्यात यावी अश्या मागण्या निवेदनामध्ये करण्यात आल्या आहेत. या निवेदनावर ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय यादव, आनंद अहिवळे, नितीन शिपकुले यांच्या सह्या आहेत.
No comments