Breaking News

गणेश विसर्जनासाठी फलटण नगर पालिकेची गाडी आपल्या दारी

              

 फलटण नगर परिषदे मार्फत दिनांक 27 ऑगस्ट 2020, 29 ऑगस्ट 2020 व 1सप्टेंबर 2020 रोजी शहरांमध्ये गणेश मूर्ती संकलन करून विसर्जन  करण्यासाठी वाहन फिरवण्यात येणार आहे अनंत चतुर्दशी दिवशी सकाळी 9.00 ते सायंकाळी 7.00 या वेळेमध्ये शहरामध्ये फिरून ट्रॅक्टर ट्रॉली व्दारे तसेच संकलन केंद्रांवर गणेश मुर्ती एकत्रित संकलन करण्यात येणार आहे. 

फलटण दि  27  ऑगस्ट  (गंधवार्ता वृत्तसेवा) -  कोरोना साथीच्या पार्श्‍वभूमीवर फलटण नगर परिषदेकडून गणेश विसर्जनासाठी फलटण शहरामध्ये ठिकाणी कृत्रिम विसर्जन केंद्र तयार करण्यात आलेले आहेत. तसेच फलटण नगर परिषदेकडून ट्रॅक्टर ट्रॉली च्या सहाय्याने  घरोघरी फिरून गणेश विसर्जनासाठी गणेश मूर्तींचे संकलन करून, त्या मूर्तींचे विधिवतरित्या विसर्जन करण्यात येणार आहे. 

        फलटण शहरात गणपती उत्सवामध्ये मोठ्या प्रमाणात घरगुती व सार्वजनिक ठिकाणी गणेश मूर्तीची स्थापना करण्यात आल्या आहेत.  सध्या वाढलेल्या कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर सर्व नागरिकांना विनंती करण्यात येते की, ज्या नागरिकांना गणेश मुर्तीचे विसर्जन घरी करणे शक्य आहे त्यांनी मूर्तीचे विसर्जन घरीच करावे. ज्यांना विसर्जन घरी करणे शक्य नाही त्यांच्या करीता फलटण नगरपरिषद मार्फत, प्रत्येक प्रभागामध्ये मुर्ती विसर्जनासाठी मुर्तीचे संकलन करण्याकरीता वाहन फिरविण्यात येणार आहे. तरी नागरीकांनी आपल्या घरातील व सार्वजनिक मंडळातील मूर्ती नगरपरिषदेकडे सुपुर्त कराव्यात. प्राप्त गणेशमुर्तीची विधीवत पुजा करून, त्यांचे विसर्जन नगरपालिकेमार्फत केले जाणार आहे. आपणास व आपल्या कुटंबियांस कोरोनापासून मुक्त ठेवण्यासाठी आपण या सामाजिक कामात सहभागी होऊन नगरपरिषदेस सहकार्य करावे असे आवाहन नगराध्यक्षा सौ. नीता मिलिंद नेवसे, उपनगराध्यक्ष नंदकुमार भोईटे, फलटण नगर परिषदेचे सर्व नगरसेवक नगरसेवक यांनी केले आहे.

फलटण शहरामध्ये कोरोना बाधितांचे संख्या मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे त्यामुळे सर्व नागरीकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. कोणत्याही शहरामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये विनाकारण गर्दी करु नये. तसेच आवश्यक्ता असेल तरच घराबाहेर पडावे.  शहरात फिरतांना 100 टक्के मास्कचा वापर करणे बंधनकारक आहे. तसेच शहरातील व्यापारी य नागरीकांनी सोशल डिस्टन्सिंगचे सर्व नियम काटेकोरपणे पाळावेत. वय वर्ष 60 चे पुढील नागरीक व वय वर्ष 10 च्या आतील मुलांनी घराबाहेर पडू नये - मुख्याधिकारी प्रसाद काटकर

      

        गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विर्सजनावेळी गर्दी टाळणेकरीता फलटण नगर परिषदेमार्फत घरोघरी फिरुन ट्रैक्टर ट्रॉलीव्दारे गणेश मूर्तींचे एकत्रीत संकलन करून घेऊन, त्यांचे विधीवत विर्सजन करणेबाबत नियोजन करणेत आलेले आहे. तसेच खालील ठिकाणी गणेश मूर्तींचे संकलन केंद्र उभारणेत येणार आहेत. 

  1.  श्रीराम मंदिर समोरील पोलीस चौकीसमोर
  2.  उंबरेश्वर चौक, मलठण
  3.  डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक
  4.  डी.एड कॉलेज चौक
  5.  नाना पाटील चौक
  6.  गजानन चौक

        तसेच घरगुती गणेश मु्तीचे कृत्रीम तळयामध्ये विर्सजन करणेसाठी सांस्कृतिक भवन, यशवंतराव चव्हाण हायस्कुल, फलटण तसेच कासारबावडी येथे सोय करणेत आली असल्याचे फलटण नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रसाद काटकर यांनी कळवले आहे.



No comments