Breaking News

स्वराज फौंडेशन ने केला कोविड योद्ध्यांचा सन्मान

स्वराज फौंडेशन यांच्यावतीने स्वराज कोविड योध्दा सन्मानपत्र देवून खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला
           फलटण ( गंधवार्ता वृत्तसेवा) -  : फलटण शहर व तालुक्यात करोनाचा वाढता प्रादुर्भाव नियंत्रणात ठेवून करोना संशयीत किंवा बाधीत रुग्णांना योग्य वैद्यकिय सेवा सुविधा उपलब्ध करुन देण्याबरोबर करोना प्रादुर्भावग्रस्त भागात योग्य पध्दतीने प्रबोधन करुन कोणत्याही परिस्थितीत नागरिकांमध्ये घबराहट निर्माण न होता करोना नियंत्रणात राहील यासाठी प्रयत्नशील असलेले अधिकारी, कर्मचारी व अन्य व्यक्ती, संस्थांचा भारतीय जनता पार्टी व स्वराज फौंडेशन फलटण यांच्यावतीने स्वराज कोविड योध्दा सन्मानपत्र देवून खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या हस्ते यथोचित सन्मान करण्यात आला.

        भारतीय स्वातंत्र्यदिन आणि माजी खासदार लोकनेते हिंदूराव नाईक निंबाळकर यांच्या जयंती निमित्त आयोजित करण्यात आलेल्या या समारंभास भाजपा पदाधिकारी, स्वराज फौंडेशनचे पदाधिकारी, नगर परिषद गटनेते अशोकराव जाधव, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे, तालुकाध्यक्ष पै. विष्णुपंत लोखंडे, स्वराज संघटनेचे अनिकेत कदम, विविध संस्थांचे पदाधिकारी व अन्य मान्यवर उपस्थित होते.

        यावेळी प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे, प्रभारी तहसीलदार रमेश पाटील, नगर परिषद मुख्याधिकारी प्रसाद काटकर, नायब तहसीलदार अनिल ठोंबरे, पोलीस निरिक्षक प्रताप पोमण व नितीन सावंत, गटविकास अधिकारी डॉ. अमिता गावडे (पवार), सहाय्यक पोलीस निरिक्षक संजय बोंबले, सचिन राऊळ, लोणंद पोलीस ठाण्याचे संतोष चौधरी, पोलीस उपनिरिक्षक विशाल भंडारी, उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ. सुभाष गायकवाड, डॉ. अंशुमन धुमाळ, नगर परिषद रुग्णालयाच्या डॉ. शितल सोनवलकर आदी अधिकार्‍यांना स्वराज कोविड योध्दा सन्मानपत्र देवून खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या हस्ते गौरविण्यात आले.


No comments